Saturday, July 6, 2024

Latest Posts

पराभव दिसू लागल्याने Uddhav Thackeray शेमड्या सारखे रडत आहेत: Nitesh Rane

उद्धव ठाकरे आणि आशिष शेलार यांवर बोलताना ते म्हणाले,'आशिष शेलार यांची तक्रार रास्त आहे. पराभव समोर दिसू लागल्याने शेमड्या सारखे उद्धव ठाकरे रडत आहेत निवडणूक लढविण्याची लायकी नसल्याने शेम्डया मुलांसारखे नाक रगडण्याचे काम ठाकरे आणि त्यांची सहकारी करत आहे.देशातील जनता मोदी साहेबांबरोबरच आहे.'

आमदार व भाजपचे नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी आज (२३ मे) पत्रकार परिषद घेतली. या परिषदेदरम्यान त्यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केले. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आशिष शेलार (Ashish Shelar) यांवर बोलताना ते म्हणाले, ‘आशिष शेलार यांची तक्रार रास्त आहे. पराभव समोर दिसू लागल्याने शेमड्या सारखे उद्धव ठाकरे रडत आहेत. निवडणूक लढविण्याची लायकी नसल्याने शेमड्या मुलांसारखे नाक रगडण्याचे काम ठाकरे आणि त्यांची सहकारी करत आहे. देशातील जनता मोदी साहेबांबरोबरच आहे.’

या नंतर जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी निवडणूक आयोगावर (Election Commission) केलेल्या आरोपावर नितेश राणे म्हणाले, ‘निवडणूक आयोग वर्षानुवर्षे भारतात लोकशाही टिकवून ठेवण्याचं काम करत आहे. महाविकास आघाडीचे हे हिरवे वळवळणारे साप आत्ता आलेले आहेत. त्यांना मतदान होत नाहीये आणि ते हरणारच आहे हे सिद्ध झाल्याने कुणालातरी बळीचा बकरा बनवण्यासाठी निवडणूक आयोगाला समोर केलं जात आहे. विरोधकांनी जिंकण्याचे तर्क २०२४ आणि २०१९ ला देखील मांडले होते. ४ जूनच्या निकालानंतर या सर्वांच्या तोंडाला कुलूप लागेल. देशाची जनता मोदीजींना आशीर्वाद देणार आहे. हे आता मतपेटी मध्ये लॉक झालं आहे.’ यानंतर गजानन किर्तिकरांवर बोलताना राणे म्हणाले, तो शिंदेसाहेबांचा आणि शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. गजानन किर्तीकर यांनी शेवटी आपल्या पक्षाचा राजधर्म पाळला पाहिजे. मुलाला वडिलांवर एवढंच प्रेम असत तर त्यांच्याबरोबर पक्षात आले असते. तरी शेवटी मुलाने गद्दारी केली.’

पुणे हिट अँड रन प्रकरणावर पुढे ते म्हणाले, ‘ नेहमी बोलणाऱ्या, देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागणाऱ्या सुप्रिया सुळे गप्प का? अगरवाल आणि त्यांच्या कुटुंबाचे काही संबंध आहेत का? आरोपीचे वकील हे शरद पवार यांचे निकटवर्तीय असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे.’ अशी प्रतिक्रिया दिली.

हे ही वाचा:

मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील; किर्तीकर- शिंदे वादावर Uday samant यांची प्रतिक्रिया

लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीतही होणार पवार विरुद्ध पवार? Sharad Pawar यांनी केला खुलासा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss