Sunday, July 7, 2024

Latest Posts

NDA च्या बैठकीत पेटला हशा ; कारण ठरले ‘नितीश कुमार’

"मोदी हे १० वर्षांपासून पंतप्रधान होते आणि आज ते पुन्हा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. '' - नितीश कुमार

आज झालेल्या NDA च्या बैठकीत अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली आणि सोबतच अनेकांनी त्यांच्या भाषणातून मोदींचे तोंडभरून कोडकौतुक केले. NDA बैठकीची प्रस्तवाना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली त्यांनतर शिंदे, जे. पी. नड्डा आणि नीतिश कुमार (Nitish Kumar) यांच्यासारख्या काही दिग्गज नेत्यांनी आपापली मते मंडली व पंतप्रधान पदी पुन्हा निवडून आलेल्या नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर स्वागतसुमनांचा वर्षाव केला. या प्रसंगी नितीश कुमार यांनी सुद्धा नरेंद्र मोदी यांच्या विषयी आपले मत व्यक्त केले. यावेळी नितीश कुमार यांनी असे बहारदार भाषण केले की सर्व नेते मंडळीसह नरेंद्र मोदी खळखळून हसले.

नरेंद्र मोदी येत्या ९ जून रोजी सायंकाळी ६ वाजता पंतप्रधान (Prime Minister) पदाची शपथ घेणार आहेत. मोदी यंदा तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत. संसद भवनाच्या सेंट्रल हॉल मध्ये आज ही बैठक पार पडली असून NDA तील सर्व घटक पक्षांनी नरेंद्र मोदी यांना अनुमोदन दिले असता, नितीश कुमार यांनीही मोदींच्या नावाला संमती दिली. याच वेळी नितीश कुमार यांनी स्वतः स्वतंत्र निर्णय घेणार या चर्चांवर आता त्यांनीच पाणी फेरले आहे.

”आज जे जिंकले आहेत ते मोदी आल्यावर हरतील”

                                                    – नितीश कुमार.

नितीश कुमार यांनी आपल्या भाषणात नरेंद्र मोदी त्यांच्यावर आपला पूर्ण विश्वास आहे. ते जे सांगतील ते आम्ही निसंकोच करू असे सांगितले. संपुर्ण भाषणात ते काय बोलले ते सविस्तर जाणून घेऊ.

“पुन्हा नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान बनणार आहेत. या प्रधानमंत्री पदासाठी मी त्यांना माझे व माझ्यापक्षाचे म्हणजे JDU पक्षाचे समर्थन देतो आहे. आनंदाची बाब म्हणजे मोदी हे गेल्या १० वर्षपासून पंतप्रधान होते आणि आता ९ तारखेला ते त्याच पदाची पुन्हा शपथ घेणार आहेत. त्यांनी त्यांच्या या १० वर्षांच्या कारकिर्दीत देशाची खूप सेवा केली आहे आणि आज पुन्हा ही संधी त्यांना चालून आली आहे. जे काम इतर कोणाकडून झालं नव्हतं ते त्यांनी सर्व केलं आहे. आता त्यातही काही बाकी असलेली काही कामे असतील ती, त्यांच्या पुढच्या ५ वर्षाच्या काळात नक्की पूर्ण करतील. ते जे काही करतील त्या प्रत्येक गोष्टीत आम्ही त्यांच्या सोबतच आहोत. ते जे काही करतील ते चांगलंच करतील असा आमचा विश्वास आहे. ते पुढील ५ वर्षांनी पुन्हा येतील तेव्हा त्यांच्या विरोधात असणारे सर्व हरतील.” या त्यांच्या विधानावर संपूर्ण बैठकीत मोठ्ठा हशा पिकला. त्यानंतर ते म्हणाले की – “इतरांच्या बोलण्यात काहीच तथ्य नाही. त्यांनी देशाची सेवा कधी केलीच नाही. ते सर्व काहीही बोलतात त्यांनी काहीच काम केलेलं नाही. आता देशाचे व बिहारचे सर्व प्रश्न त्वरित सुटतील अशी आमची खात्री आहे. आता सध्या जे काही बाकी आहे ते मोदी पूर्ण करतील. सर्वच सोबत आहेत ही गोष्ट चांगलीच आहे. तुम्ही देशाला पुढे कसे आणाल या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जितक्या लवकर होईल तितक्या लवकर तुम्ही या पदाची शपथ घ्या ती शपथ तुम्ही आज जरी घेतली असती तरी उत्तम झाले असते. कारण, ‘अच्छे काम के लिये देरी क्यू ‘ तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही या देशाला पुढे घेऊन जाऊ.” असे म्हणून मोदींना नितिश कुमार यांनी स्वागत सुमनांजली बहाल केली.

यावेळी त्यांची भाषण शैली ही गमतीदार होती. त्यांच्या काही वक्तव्यांनी संपूर्ण बैठकीत एक नवीन तेज आणले. त्यांच्या गंमतीदार भाषणाने संपूर्ण संसद हॉल आनंदून गेला. त्यांच्या बऱ्याच वाक्यांनी NDA बैठकीसह नरेंद्र मोदी यांना हसू फुटले.

 

 ही वाचा:

केंद्रात सत्तास्थापनेत NDA च्या घटक पक्षांना मिळणार जागा..

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss