Congress कडून Praniti Shinde, मग BJP कडून कोण?

Congress कडून Praniti Shinde, मग BJP कडून कोण?

काही दिवसांपूर्वी ‘काँग्रेसच माझ्या रक्तात’ असल्याचे वक्तव्य करणाऱ्या सोलापूर लोकसभा मतदार संघाच्या आमदार प्रणिती शिंदे यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून गाव भेटींचा दौरा सुरू केला होता. त्यानंतर आता काँग्रेसच्यावतीने त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) ह्या सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघातून कॉंग्रेसच्या विद्यमान आमदार असून त्यांनी तीन वेळा त्यांनी या मतदारसंघातून विजय मिळवला आहे. ‘जाई-जुई’ या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून प्रणिती शिंदे यांनी आपल्या सामाजिक आणि राजकीय जीवनाची सुरुवात केली. २००९ रोजी त्यांनी कॉंग्रेसच्या तिकिटावर सोलापूर मध्य या जागेवरून विधानसभा निवडणूक लढवली होती. तत्कालीन आमदार आणि नेते कॉम्रेड नरसय्या आडम यांचा प्रभाव करून प्रणिती शिंदे यांनी बाजी मारून विधानसभेत प्रवेश केला होता. महाविकास आघाडीकडून प्रणिती शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाली असली, तरीही आता भारतीय जनता पक्षाकडून लोकसभेसाठी कोणाला उमेदवारी मिळणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हे ही वाचा:

मुंगी कितीही लहान असली तरी हत्तीचा चव घेऊ शकते;पुणे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी वसंत मोरे इच्छुक

सरकारमध्ये अनेक भ्रष्टाचारी लोक आहेत; मनोज जरांगेंचा सरकारवर आरोप

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version