Thursday, July 4, 2024

Latest Posts

Rahul Gandhi यांनी स्वीकारलं PM Modi यांच्यासोबत जाहीर चर्चेचं आव्हान !

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत जाहीर चर्चा करण्याचे आव्हान स्वीकारले आहे. माजी न्यायमुर्ती मदन लोकूर, अजित शहा आणि ज्येष्ठ पत्रकार एन राम यांनी या चर्चेचा प्रस्ताव ठेवला होता.

काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सोबत जाहीर चर्चा करण्याचे आव्हान स्वीकारले आहे. माजी न्यायमुर्ती मदन लोकूर, अजित शहा आणि ज्येष्ठ पत्रकार एन राम यांनी या चर्चेचा प्रस्ताव ठेवला होता. आता, राहुल गांधी यांनी हे चॅलेंज स्वीकारलं असून पंतप्रधान मोदींशी वादविवाद करण्याची तयारी दर्शवली आहे. तसेच राहुल गांधी यांनी न्यायमूर्तींना पत्र लिहून ‘पंतप्रधान मोदी यासाठी तयार होतात का? ते केव्हा तयार होतात ते कळवा, असते म्हंटले आहे.

राहुल गांधी यांनी जाहीर डिबेटचे आव्हान स्वीकारत निवृत्त न्यायमूर्ती मदन लोकूर, निवृत्त न्यायमूर्ती अजित शाह आणि ज्येष्ठ पत्रकार एन राम यांना पत्र लिहिले आपल्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून पोस्ट करत त्यांनी याची माहिती दिली. यावेळी ते म्हणाले, “सुदृढ लोकशाहीसाठी प्रमुख पक्षांनी एकाच व्यासपीठावरुन देशासमोर आपले व्हिजन मांडणे हा सकारात्मक उपक्रम ठरेल. काँग्रेस या उपक्रमाचे स्वागत करते आणि चर्चेचे निमंत्रण स्वीकारते. पंतप्रधानांनीही या संवादात सहभागी व्हावे, अशी देशाची अपेक्षा आहे.”

निवृत्त न्यायमूर्ती मदन बी. लोकूर, निवृत्त न्यायमूर्ती अजित पी. ​​शहा आणि ज्येष्ठ पत्रकार एन. राम, यांना संयुक्तरित्या पत्र लिहीत ते म्हणाले, “लोकसभा निवडणूक २०२४ वरील सार्वजनिक चर्चेसाठी तुम्ही आमंत्रित केल्याबद्दल मी तुमचे आभार मानू इच्छितो. मी तुमच्या निमंत्रणावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी चर्चा केली आहे. आम्ही सहमत आहोत की अशा वादविवादामुळे लोकांना आमचे व्हिजन समजण्यास मदत होईल आणि त्यांना निवड करण्यात मदत होईल. आमच्या पक्षांवर केलेले कोणतेही बिनबुडाचे आरोप थांबवणे देखील महत्त्वाचे आहे. निवडणूक लढवणारे प्रमुख पक्ष म्हणून, जनतेने त्यांच्या नेत्यांना थेट ऐकणे योग्य आहे. त्यानुसार मी किंवा काँग्रेस अध्यक्षांना अशा चर्चेत सहभागी होण्यास आनंद होईल.”

पुढे पत्रात ते म्हणाले, “कृपया आम्हाला कळवा की पंतप्रधान कधी सहभागी होण्यास सहमत आहेत, त्यानंतर आम्ही चर्चेचे तपशील आणि स्वरूप यावर चर्चा करू शकतो. तुमच्या पुढाकाराबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. मी या ऐतिहासिक चर्चेत भाग घेण्यासाठी उत्सुक आहे.”


अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकांवेळी दोन्ही पक्षाचे उमेदवार जाहीर चर्चा करतात. त्यामुळे नागरिकांना दोन्ही नेत्यांची मते आणि दृष्टिकोन समजून घेण्यास मदत होते. त्याच धर्तीवर पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असलेल्या दोन्ही नेत्यांची जाहीर डिबेट आयोजित करण्याचा मानस आहे. जेणेकरून, दोन्ही नेते समोरासमोर उभे राहून चर्चा करतील आणि नागरिकांना त्यांची मते समजून मतदान करणे सोपे जाईल. आता राहुल गांधी यांनी हे आव्हान स्वीकारले असून पंतप्रधान मोदी हे आव्हान स्वीकारणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा:

‘लंकेना दमदाटी केली तर………;’ सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना इशारा

Sanjay Raut यांची ठाकरेंवर टीका, ‘प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचा आत्मा…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss