Ramesh Baraskar यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी, माढा मतदारसंघात तिरंगी लढत

Ramesh Baraskar यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी, माढा मतदारसंघात तिरंगी लढत

वंचित बहुजन आघाडीकडून (Vanchit Bahujan Aghadi) रमेश बारसकर (Ramesh Baraskar) यांना आगामी लोकसभा निवडणुकांसाठी (Loksabha Elections ) उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. माढा लोकसभा मतदारसंघातून रमेश बारसकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. रमेश बारसकर हे याआधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) कार्यरत होते. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर ते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या गटात कायम राहिले. त्यांच्यावर पक्षाच्या चिटणीसपदाची जबाबदारी देण्यात आली होती. परंतु, त्यांना वंचित बहुजन आघाडीकडून (VBA) उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून त्यांच्यावर मोठी कारवाई करत त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.

वंचित बहुजन आघाडीकडून आगामी लोकसभा निवडणुकांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले. महाविकास आघाडीतील जागावाटपाच्या तिढ्यामुळे “वंचित”ने ही लोकसभा निवडणूक स्वतंत्रपने लढण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने, त्यांनी राज्यातील २० जागांवर उमेदवारांची यादी जाहीर केली. रमेश बारस्कर यांना राष्ट्रवादीतून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी “वंचित” सोबत जाण्याचा निर्णय घेतला. “वंचित” चे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही बारसकर यांना उमेदवारी देऊ केली.

रमेश बारसकर यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी

रमेश बारसकर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या चिटणीसपदी कार्यरत होते. सोलापूर जिल्ह्यातील माढा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी ते प्रयत्नशील होते. अजित पवार गटातील छगन भुजबळ यांच्यासोबत ते संपर्कात होते. तसेच, ऍंडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्याबरोबरही त्यांचा संपर्क अलीकडेच वाढला होता. ही बाब लक्षात घेता त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून देण्यात आले.

माढा मतदारसंघात होणार तिरंगी लढत

भारतीय जनता पक्षाकडून (BJP) रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महाविकास आघाडीने मात्र अद्याप या ठिकाणी आपला उमेदवार दिलेला नाही. आता, “वंचित”ने रमेश बारसकार यांना उमेदवारी देऊ केल्यामुळे माढामध्ये तिरंगी लढत होणार आहे. २०१९ साली रणजितसिंह निंबाळकर यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली होती आणि त्यावेळी रणजितसिंह निंबाळकर निवडूनदेखील आले होते. यावेळी पुन्हा भाजपने त्यांच्यावरच विश्वास ठेवला आहे. त्यामुळे, यावेळी या मतदारसंघात चुरशीची लढत होऊ शकते. परंतु, महाविकास आघाडीने अद्याप उमेवार जाहीर न केल्यामुळे तसेच “वंचित”ने उमेदवारी जाहीर केल्यामुळे संभाव्य मतविभाजन लक्षात घेता भाजपचे पारडे जड मानले जात आहे.

हे ही वाचा:

संविधान वाचवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे, रामलीला मैदानातून शरद पवारांनी केले नागरिकांना आव्हान

शेपटीला चिंधी लावून महायुतीत व्यत्यय आणू नये, संजय शिरसाटांनी केली गिरीश महाजनांवर टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version