लोकसभा निवडणुकीसाठी RPI सज्ज, महाराष्ट्रातील उमेदवारांची नावे जाहीर

लोकसभा निवडणुकीसाठी RPI सज्ज, महाराष्ट्रातील उमेदवारांची नावे जाहीर

लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) रिंगणात आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (Republican Party of India) हा पक्ष उतरला आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाने महाराष्ट्रातील उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे यांनी महाराष्ट्रातील नव उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये नागपूर आणि विदर्भातील उमेदवारांचा समावेश आहे. नागपूर (Nagpur) मधून रेखा गोगले, अमरावतीतून (Amravati) कैलास मोरे, रामटेक (Ramtek) मधून अमोल वानखेडे या उमेदवारांचा समावेश आहे.

दीपक निकाळजे हे मागील वीस वर्षांपासून आंबेडकरी चळवळीत सक्रिय आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली दीपक निकाळजे यांचे काम सुरू होते. त्यानंतर त्यांनी रामदास आठवले यांच्यापासून वेगळे होऊन स्वतःचा गट स्थापन केला. या गटाचे नाव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्ष (आंबेडकर) दीपक निकाळजे असे आहे.

कितीही झालं तरी इंडिया आघाडीत आम्ही जाणार नाही, बाबासाहेब आंबेडकरांच्या म्हणण्यानुसार सत्तेत विकास करण्यासाठी आम्ही राहणं पसंत करू, असं रामदास आठवले काही दिवसांपूर्वी म्हणाले होते. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा छोटा पक्ष असला तरी महाराष्ट्रात दोन जागा आम्हाला मिळणं अपेक्षित आहे. राज ठाकरे यांच्या निर्णयावर आम्हाला विश्वास नाही, आमच्या युतीत राज ठाकरे येणे अनपेक्षित आहे, असं सुद्धा रामदास आठवले म्हणाले होते. यासोबतच, उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे असं म्हणत आठवले यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र उभारले होते. त्यानंतर आता रामदास आठवले यांचा पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने अजूनही किती जागा लढवणार याबाबत कोणतीही घोषणा केली नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात नेमकी कोणती घोषणा केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा:

बारामतीत शिवतारेंच्या झटक्याने रासपच्या जानकरांना एका जागेची लॅाटरी

Exclusive: उठा उठा निवडणूक आली, ‘दिघे’ नावाची आठवण झाली!

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version