spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Eknath Shinde हे कोणालाच CM म्हणून नको होते; Sanjay raut यांचा गौप्यस्फोट

"एकनाथ शिंदेंच्या कामाची पद्धत 'पैसा फेको, तमाशा देखो' हीच असल्यामुळे अनेकांना ते आपल्या आसपास नको होते.अशी आम्ही महाविकास आघाडीची स्थापना करण्याआधी भाजपची भुमिका होती." असं दावा संजय राऊत (sanjay raut) यांनी केला.

“देवेंद्र फडणवीस, गिरीष महाजन, सुधीर मुनगंटीवार यांचा एकनाथ शिंदे यांच्या नावाला विरोध होता. एकनात शिंदे हे भाजप आणि राष्ट्रवादीला ‘मुख्यमंत्री’म्हणून नकोसे होते”असा दावा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. तर “देशात सत्तापालट होणार आणि पुन्हा एकदा आमची सत्ता येणार.” असा ही विश्वास संजय राऊत यांनी दर्शवला. 

शरद पवारांच्या गौप्यस्फोटावर,”शरद पवारांनी प्रफुल्ल पटेल यांच्याबद्दल जे सांगितलं ते मला गौप्यस्फोट वाटत नाही. ते उघड सत्य होतं. ते सगळ्यांना माहित होतं. त्यात नवीन काही नाही.”असं वक्तव्य संजय राऊत (sanjay raut) यांनी केलं. 

पुढे ते  म्हणाले की, “एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदी नको. आम्ही त्यांच्या हाताखाली काम करणार नाही. हे सांगणारे सुनील तटकरे, अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील होते. आम्ही सिनियर आहोत ज्युनियर माणसाच्या हाताखाली काम करणार नाही.”अशी त्यावेळी त्यांची भुमिका होती”असा दावा  संजय राऊत यांनी केला. 

“२०१९ मध्ये जेव्हा मुख्यमंत्रीपदावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये वाद झाला होता. त्यानंतर महाविकास आघाडीची स्थापना झाली. विधीमंडळ पक्षाच्या नेतेपदी एकनाथ शिंदेंचीच(Eknathshinde) निवड झाली होती आणि सेनेकडून एकनाथ शिंदे (Eknathshinde) यांचेच नाव पुढे केलं असतं पण भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांनी आम्हाला निरोप पाठवला होता की, मुख्यमंत्रीपदाबाबत दिल्लीचा निर्णय काय येईल हे माहित नाही पण आम्हाला एकनाथ शिंदे (Eknath shinde) मुख्यमंत्री म्हणून चालणार नाही. अशी भुमिका देवेंद्र फडणवीस यांच्यापासून अन्य नेत्यांची होती.”असा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. 

“एकनाथ शिंदेंच्या कामाची पद्धत ‘पैसा फेको, तमाशा देखो’ हीच असल्यामुळे अनेकांना ते आपल्या आसपास नको होते.अशी आम्ही महाविकास आघाडीची स्थापना करण्याआधी भाजपची भुमिका होती.” असं दावा संजय राऊत (sanjay raut) यांनी केला.

Latest Posts

Don't Miss