“वाघ” कोण हे ४ जूनला कळेल; Sanjay Raut यांचा विश्वजित कदमांना खोचक टोला

पाटलांना विजयी केले पाहिजे मग आम्ही ४ जूनला येऊन या वाघांचा सत्कार करू"असे म्हणत विश्वजित कदम यांच्या वक्तव्याला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले

“वाघ” कोण हे ४ जूनला कळेल; Sanjay Raut यांचा विश्वजित कदमांना खोचक टोला

काल सांगलीमध्ये महाविकास आघाडीची जाहीर सभा पार पडली. त्यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांच्यासमोर कॉंग्रेसचे नेते विश्वजीत कदम (Vishwajit kadam) यांनी “आपण देशाचे आणि महाराष्ट्राचे वाघ आहात पण सांगलीचे वाघ आम्ही आहोत” असं वक्तव्य केलं आणि त्या वक्तव्यावरुन महाविकास आघाडीत झुंपली.”सांगलीमध्ये अनेक वाघ दिसत आहेत त्यांचे जतन करणं गरजेचं आहे” असं म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी विश्वजित कदम यांना टोला लगावला.

 

 

आज सांगली येथे संजय राऊत (Sanjay raut) यांची पत्रकार परिषद होती. त्या पत्रकार परिषदेत विश्वजित कदम(Vishwajit kadam) यांनी केलेल्या वक्तव्याविषयी विचारले असता, “सांगलीत वसंतदादा पाटील हा वाघ आम्ही पाहिलेला आहे. बाळासाहेब ठाकरे(Balasaheb Thackeray), शरद पवार(Sharad pawar), उद्धव ठाकरे(Uddhav thackeray) हे आम्ही पाहिलेत, वाघाची रचना आणि वाघाचा स्वभाव वेगळा असतो. विश्वजित कदम नक्कीच वाघ असतील पण ते वाघ आहेत की नाही हे ४ जूनला कळेल. जर त्यांनी मोठ्या ताकदीने चंद्रहार पाटलांना विजयी केले तर ते नक्कीच वाघ आहेत अशी पदवी आम्ही त्यांना देऊ. मविआच्या इथल्या प्रमुख नेत्यांना स्वत:ला वाघ असल्याचं सिद्ध करायचं असेल तर त्यांनी चंद्रहार पाटलांना विजयी केले पाहिजे मग आम्ही ४ जूनला येऊन या वाघांचा सत्कार करू”असे म्हणत विश्वजित कदम यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिले.

पुढे ते म्हणाले, “शिवसेना अधिकृतपणे वाघ आहे. आमचे बोधचिन्ह वाघ हे बाळासाहेब ठाकरेंनी साकारलं आहे. वाघ हा समोरून हल्ला करतो. वाघ उत्तम शिकारी असून तो समोरून हल्ला करतो. झुडपात बसून वाघ कारस्थाने करत नाही. त्यामुळे सांगलीत कोण वाघ हे कळेल, सांगलीतील जनता वाघासारखी आहे. ती कुठलीही कारस्थाने, डावपेच सहन न करता पैलवान चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांच्या मागे उभी राहील.”

“चंद्रहार पाटील कुठेही कमी पडत नाही. त्यांचे साखर कारखाने नाहीत, त्यांनी शेतकऱ्यांचे पैसे बुडवले नाहीत. संस्था बुडवल्या नाहीत. हा त्यांचा कमकुवतपणा नाही. ही त्यांची ताकद आहे. ते प्रामाणिक आहेत. असे अनेक उमेदवार मित्रपक्षाने उभे केलेत, ते कमकुवत असले तरी आम्ही त्यांचा प्रचार करतोय. हे आम्ही सांगत नाही. आम्हाला माहित आहे आम्ही वाघ आहोत.” असे म्हणत संजय राऊत यांनी मित्रपक्षांवर टीका केली.

Exit mobile version