spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अजित पवारांच्या अनुपस्थितीवर शरद पवारांचा खुलासा

उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीची महासभा होणार आहे. त्यामुळे शरद पवारांच्या उत्तराने उद्या (१७ मे) रोजी होणाऱ्या महासभेत अजित पवार उपस्थित राहणार का ? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. 

लोकसभा निवडणूकीच्या पाचव्या टप्प्याचं मतदान २० मे रोजी पूर्ण होणार आहे. यासाठी काल १५ मे रोजी भाजपचे उमेदवार मिहीर कोटेचा (mihir kotecha)यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM narendra modi) यांनी काल घाटकोपर येथे रोड शो केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत आल्याने सर्वांचे लक्ष त्यांच्याकडेच होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknathshinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra fadanvis), मिहिर कोटेचा(Mihir kotecha), आशिष शेलार(ashish shelar), किरीट सोमय्या (kirit somiyaa), आदी नेत्यांची उपस्थिती होती. पण या संपूर्ण कार्यक्रमात एका प्रमुख गैरहजेरी दिसून आली. उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar)यांच्या अनुपस्थितीमुळे चर्चांना उधाण आलं.

काल १५ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांची नाशिक येथे सभा पार पडली. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknathshinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra fadanvis), राष्ट्रवादी कॉंग्रेसचे छगन(chhagan bhujbal) भुजबळ, शिवसेनेचे आमदार सुभाष कांदे(suhas kande), इतर नेत्यांची उपस्थिती होती पण त्या कार्यक्रमात देखील उपमुख्यमंत्री अजित पवारांची अनुपस्थिती दिसून आली आणि त्यानंतर पंतप्रधानांचा ताफा मुंबईच्या दिशेने रवाना झाला. ईशान्य मुंबईचे भाजपचे उमेदवार मिहिर कोटेचा(mihir kotecha)यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी(narendra modi)प्रचाराच्या रिंगणात उतरुन महायुतीसाठी घाटकोपर येथे रोड शो घेतला. मात्र या सगळ्यां कार्यक्रमात आणि मुख्यता पंतप्रधान मुंबईत आल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांची अजित पवार नसल्याने चांगल्याच चर्चा रंगल्या.

दरम्यान, आज नाशिक येथे शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांना अजित पवारांच्या गैरहजरीबाबत प्रश्न विचरला असता,”अजित पवार हे आजारी आहेत.त्यांची तब्येत ठीक नाही आहे”असा खुलासा केला.उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीची महासभा होणार आहे. त्यामुळे शरद पवारांच्या उत्तराने उद्या (१७ मे) रोजी होणाऱ्या महासभेत अजित पवार उपस्थित राहणार का ? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

हे ही वाचा:

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss