spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

“मोदींना शेतकऱ्यांवर बोलणं गरजेचं वाटत नाही”; sharad pawar यांची narendra modiयांच्यावर टीका

मुंबईसारख्या शहरात रोड शो करणं हे शहाणपणाचं लक्षण नाही"अशा शब्दात शरद पवारांची पंतप्रधानांवर घणाघाती टीका केली. 

लोकसभेच्या निवडणूकीच्या अंतिम टप्प्यासाठी आघाडी आणि महायुतीकडून आरोप-प्रत्यारोप सुरुच आहेत. शेवटच्या टप्प्यासाठी प्रचारसभांच्या धडाका जोरदार सुरु आहे.अशातच काल १५ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपचे ईशान्य मुंबईचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचारासाठी घाटकोपर येथे रोड शो करत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार म्हणुन मार्गात बदल केले होते तर मुंबई पूर्व उपनगर आणि ठाण्याला जोडणारा लाल बहादूर शास्त्री (LBS Road) मार्ग रोड शो साठी बंद ठेवण्यात आला होता.याशिवाय वर्सोवा-घाटकोपर मेट्रो सेवाही बंद ठेवण्यात आली होती.त्यामुळे नागरिकांचे हाल झाले आणि अनेकांनी संताप व्यक्त केला. यावर शरद पवारांनी हल्लाबोल करत मोदींवर टीका केली.

“नरेंद्र मोदी यांचा आत्मविश्वास ढासळला आहे त्यामुळे नरेंद्र मोदी भरकटले आहेत.आत्मविश्वास गेल्याने मोदी धर्म आणि जातींवर बोलतात.मोदींनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मानसिकता समजून घ्यायला हवी. नरेंद्र मोदी यांनी आधी आपला पक्ष सांभाळावा. मोदींच्या रोड शोमुळे लोकांना त्रास झाला.मोदींच्या रोड शोमुळे मुंबईकरांचे हाल झाले. मुंबईसारख्या शहरात रोड शो करणं हे शहाणपणाचं लक्षण नाही”अशा शब्दात पंतप्रधानांवर घणाघाती टीका केली.

पुढे ते म्हणाले की,”मोदी सीएम असताना गुजरातचे प्रश्न माझ्याकडे घेऊन यायचे.मोदी आता राजकारणासाठी माझ्यावर टीका करत आहे.”असं ही ते म्हणाले. काल मोदींच्या कल्याण आणि नाशिक येथे सभा झाल्या. कांदा निर्यात बंदीचा विषय महत्त्वाचा असताना नाशिक येथे येऊ शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाष्य न केल्याने शेतकरी संतप्त झाले असल्याचे पहायला मिळाले. यावरुन “मोदींना शेतकऱ्यांवर बोलणं गरजेचं वाटत नाही.”असं म्हणत मोदींवर टिकास्त्र सोडले. दरम्यान लोकसभा निवडणूक आता शेवटच्या टप्प्यात आल्याने महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा वाद शिगले पाहचला आहे.

हे ही वाचा:

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss