spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

काय करायचं ते मुख्यमंत्री ठरवतील, मुख्यमंत्र्यांची इच्छा असेल तर…काय म्हणाले Vijay Shivtare?

विजय शिवतारे यांनी माध्यमांशी संवाद साधत असतांना एकनाथ शिंदे यांच्या परवानगीने भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवायला तयार असल्याचे स्पष्ट केले. भाजप आणि शिवसेना दोन्हीही मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी काम करत आहोत, आम्ही एका विचाराचे आहोत. मुख्यमंत्री जर आढळराव यांना घड्याळावर लढायला परवानगी देत असतील तर मुख्यमंत्र्यांची इच्छा असेल तर मी लढेल. मी फक्त माझी इच्छा सांगितली, बाकी काय ठरवायचं ते मुख्यमंत्री ठरवतील, असे माध्यमांशी बोलताना विजय शिवतारे यांनी सांगितले. 

अजित पवार कधीही कोणाचे होऊ शकत नाहीत

भाजपचे कार्यकर्ते आता अजित पवारांना का सोबत घेतले असा प्रश्न विचारत आहेत. इतर निवडणुकीला भाजप मात्र या निवडणुकीला आम्ही तुम्हाला मदत करून तुम्ही हटू नका अशी भूमिका भाजपच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे.  खडकवासला मतदारसंघात जर भाजपने घड्याळ चालवण्याचा प्रयत्न तर पुढच्या काही दिवसात अजित पवार भाजपला मारायला निघाले आहेत. अजित पवार कधीही कोणाचे होऊ शकत नाहीत. नेत्यांनी काही केलं तरी हे गुप्त मतदान आहे. त्यामुळे कार्यकर्ते मला मदत करायला तयार असल्याचे विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्या मुद्द्यावर म्हटले. 

लोकसभा आली की गोड बोलायचं आणि विधानसभेला…

अनंतराव थोपटे मुख्यमंत्री होत असताना ज्यांनी त्यांना कटकारस्थान करून ज्यांनी त्यांना पाडले. हर्षवर्धन पाटील यांना लोकसभा आली की गोड बोलायचं आणि विधानसभेला त्यांना धक्का देऊन टाकायचा, असे म्हणत शिवतारे यांनी थोपटे परिवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यावर टीकास्त्र उगारले. 

बारामतीमधील जनता त्यांना धडा शिकवेल

पवार कुटुंबातील नेते हे राजकारणातील अविश्वास आणि राक्षसीपणा असलेले नेते आहेत. दोन्ही पवारांच्या विरोधात मी ताकदीने विरोध करणार आहे. पवार कुटुंबियांची प्रवृत्ती मोडून काढण्यासाठी मी निवडणूक लढत आहे. मतदारांना देखील अशी नामी संधी नाही. त्यामुळे लोकांनी जनशक्ती ही जनशक्तीपेक्षा मोठी आहे हे पवारांना दाखवून द्यावे. शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होते मग बारामती तालुक्यातील ४२ गावांना पाणी मिळालं का? १९९९ साली अजित पवार मुख्यमंत्री होते. पवारांनी आम्हाला काय दिले हे त्यांनी सांगावे. पुरंदर, दौंड, इंदापुर या लोकांना त्यांनी काय दिलं हे सांगावे. माझा विरोध दोन्ही पवारांना आहे. त्यामुळे मी कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही. अशी माहिती देत पवार कुटुंबीयांबाबत विजय शिवतारे यांनी हल्लाबोल केला. अजित पवार आणि शरद पवार जर मातब्बर नेते आहेत तर मग मी निवडणूक लढवत असेल तर माझ्या पक्षाला ब्लॅकमेलिंग का करीत आहेत? बारामतीमधील जनता त्यांना धडा शिकवेल ही खात्री पवार कुटुंबीयांना झालेली आहे. २०१४ ला जाणकारांनी भाजपचे कमळ चिन्ह घेतले  असते, तर त्यांचा डाव पडला असता. तांत्रिकदृष्ट्या निवडणूक कशी जिंकायची हे पवारांना चांगलं माहित आहे. पवारांच्याबरोबर असलेली मतं यात विभाजन होईल आणि पवारांच्या विरोधात असलेली मतं तुतारी आणि घड्याळाला जाणार नसल्याचे मत माजी आमदार विजय शिवतारे यांनी मांडले. 

हे ही वाचा:

उद्धव ठाकरेंकडून अभिषेक घोसाळकरांच्या पत्नीला लोकसभेचे तिकीट मिळण्याची शक्यता

मराठवाड्यात शिंदेंच्या शिवसेनेला एकच जागा मिळणार, संभाजीनगरची जागा भाजपाकडे जाण्याची शक्यता

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss