Sunday, July 7, 2024

Latest Posts

NARENDRA MODI OATH CEREMONY : सत्तास्थापनेत ‘या’ खासदारांची नावे निश्चित

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या शपथविधी सोहळ्याची (Oath Ceremony) संपूर्ण तयारी झाली आहे. आज संध्याकाळी ७. १५ ला ते तिसऱ्यांदा शपथ घेतील. नियमा नुसार एकूण ७८ मंत्री मंत्रिमंडळात असतात. त्यापैकी आज ४० ते ४५ मंत्रीसुद्धा आज मंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. या मंत्रिपदांसाठी प्रधानमंत्री कार्यालयातून दूरध्वनी साधण्यात आले. यात महाराष्ट्रात एकूण सद्यघडी व विद्यमान स्थितीला पाच जणांना व TDP , LJP (R) आणि JDU या पक्षातील खासदारांना सुद्धा मंत्री पदासाठी प्रधानमंत्री कार्यालयातून दूरध्वनी गेल्याची बातमी मिळाली आहे.

आता पर्यंत या मंत्रिपदासाठी एकूण ३२ जणांची नावे समोर आलेली आहे. त्यात पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) , प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav), नितीन गडकरी (Nitin Gadkari), रक्षा खडसे (Raksha Khadse), रामदास आठवले (Ramdas Athavle) आणि पियुष गोयल (Piyush Goyal)  यांची नावे समोर आली आहेत. त्याच प्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एकही मंत्रिपद मिळणार नाही. यासाठी भाजप व इतर मित्र पक्ष यांच्यात चर्चा झाली. अमित शहा(Amit Shaha) व राजनाथ सिंह (Rajnath Sigh) यांच्या शिवाय भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा (J.P. Nadda), जेडीयूचे (JDU) प्रमुख नितीश कुमार (Nitish Kumar), टीडीपीचे (TDP) चंद्राबाबू नायडू(Chandrababu Naidu), व शिवसेनेचे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) इत्यादींशी मंत्रिपदासाठीचे बोलणे झाले. त्यानंतर आज त्यांची नावे अंतिम दूरध्वनी केले जात आहेत. त्या सर्व खासदारांना ही आज मंत्रिपदासाठी आजच शपथ घेणार आहेत.

मंत्रीपदे मिळणाऱ्या खासदारांची यादी व पक्ष पुढील प्रमाणे –

१. हिंदुस्थान आवाम मोर्चा (HAM) – जितन राम मांझी

२. राष्ट्रीय लोकदल (RLD) – जयंत चौधरी

३. आपना दल (Apna Dal)  – अनुप्रिया पटेल

४. तेलगु देसम पार्टी (TLD) – डी.आर. चंद्रशेखर

५. टीडीपी (TDP) – के राम मोहन नायडू.

६. भारतीय जनता पार्टी (BJP) – नितीन गडकरी

७. भारतीय जनता पार्टी (BJP) – राजनाथ सिंह

८. भारतीय जनता पार्टी(BJP) – अमित शाह

९. भारतीय जनता पार्टी (BJP) – अर्जुनराम मेघावाल

१०. जनता दल युनायटेड – राम नाथ ठाकुर

११. जनता दल युनायटेड – एच.डी.कुमारस्वामी

१२. ऑल झारखंड स्टुडंट्स युनिअन – . सुदेश महतो

१३. लोकजनशक्ती पार्टी – चिराग पासवान

१४. भारतीय जनता पार्टी – मनसुख मांडविय

१५. जनसेवा पार्टी (होल्ड) – पवन कल्याण

१६. भारतीय जनता पार्टी (BJP)- पियुष गोयल

१७. भारतीय जनता पार्टी (BJP) – . ज्योतिरादित्य शिंदे

१८. भारतीय जनता पार्टी (BJP) – कमलजीत सेहरावत

१९. भारतीय जनता पार्टी (BJP) – के. अन्नामलाई

२०. भारतीय जनता पार्टी (BJP) – रक्षा खडसे

२१. शिवसेना (Shivsena) – प्रतापराव जाधव

२२. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले [RPI(A)]  – रामदास आठवले

२३. भाजप  (BJP)- मनोहरलाल खट्टर

२४. भारतीय जनता पार्टी (BJP) – राव इंद्रजीत सिंह

२५. भारतीय जनता पार्टी (BJP) – सुरेश गोपी

२६. भारतीय जनता पार्टी (BJP) – ज्युएल ओरम,

२७. भारतीय जनता पार्टी (BJP) – मुरलीधर मोहोळ

२८. भारतीय जनता पार्टी (BJP) – किशन रेड्डी

२९. भारतीय जनता पार्टी (BJP) – बंदी संजय कुमार

३०. भारतीय जनता पार्टी (BJP) – गिरिराज सिंह

३१. भारतीय जनता पार्टी (BJP) – रवनीत बिट्टू

३२. भारतीय जनता पार्टी (BJP) – निर्मला सीतारमन

३३. भारतीय जनता पार्टी(BJP)  – अन्नपूर्णा देवी

३४. भारतीय जनता पार्टी (BJP) – सीआर पाटिल

३५.भारतीय जनता पार्टी (BJP) – अजय टम्टा

३६.भारतीय जनता पार्टी  (BJP) – एस. जयशंकर

३७. भारतीय जनता पार्टी (BJP) – जे. पी. नड्डा

इत्यादींना मंत्रिपद तूर्तास मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याच सोबत भाजपकडे काही महत्वपूर्ण खाती राहणार आहेत. पीटीआयच्या माहिती नुसार गृह, अर्थ,संरक्षण व विदेश मंत्रालय इत्यादींसारखी अतिशय महत्वाची असलेली खाती भाजपकडेच असणार आहेत. सोबतच शिक्षण व सांस्कृतिक मंत्र्यांची खाती सुद्धा भाजपकडे असतील. मित्र पक्षांना ५ ते ८ कॅबिनेट मंत्रीपदे मिळू शकतील. शिवराज सिंह, बसवराज बोम्मई, मनोहरलाल खट्टर यांना सुद्धा नव्या सरकारमध्ये सामील करून घेतले जाईल.

हे ही वाचा:

Monsoon Updates: मेघगर्जनेसह पाऊस कोसळणार, कधी आणि कुठे?

PM Narendra Modi यांनी घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट; सत्तास्थापनेचं दिलं आमंत्रण

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss