spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

यंदाच्या वर्षी तब्बल २ लाख मतदार हे १०० वर्ष वयाचे , निवडणूक आयुक्तांनी दिली माहिती

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेला सुरुवात झाली आहे. या परिषदेमध्ये मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर लगेच आचारसंहिता लागू होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त्त राजीव कुमार यांनी काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. राजीव कुमार म्हणाले, देशभरात एकूण ९७ कोटी मतदार हे नोंदीकृत आहेत. देशभरामध्ये साडेदहा लाखांपेक्षा जास्त मतदान केंद्र, ५५ लाखांपेक्षा अधिक EVM, १. २ कोटी प्रथम मतदार, ४८ हजार तृतीयपंथी, १०० वर्षापेक्षा जास्त मतदारांची संख्या २ लाख ,१. ५ कोटी निवडणूक अधिकारी, १८ ते २१ वयोगटातील मतदारांची संख्या २१.५० कोटी, १२ राज्यात पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक आहे. मतदान करायला मतदान केंद्रावर गेल्यानंतर विशेष सोयी केल्या जाणार आहेत. मतदान केंद्रावर शौचालय, व्हिलचेअर, पिण्याच्या पाण्याची सुविधा दिल्या जाणार आहेत.

Latest Posts

Don't Miss