spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘मोदी सरकारची हि कौरवनिती आहे’, Uddhav Thackeray यांची PM Modi यांवर टीका

शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'सामना' या वृत्तपत्राला विषेश मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी अनेक विषयांवर भाष्य केले.

देशभरात लोकसभा निवडणुकीचे (LoksabhaElection 2024)सत्र सुरु आहे. तीन टप्पे पार पडले असून उद्या (१३ मे सोमवार) लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडेल. अजूनही मतदानाचे चार टप्पे बाकी असून सर्वच राजकीय पक्ष जोर लावत आहेत. शिवसेना उबाठा (Shivsena UBT) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ‘सामना’ (Samna) या वृत्तपत्राला विषेश मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदी आणि भाजपवर जोरदार टीका केली. शिवसेना उबाठा नेते आणि सामनाचे संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांनी हि विशेष मुलाखत घेतली होती.

मुलाखतीदरम्यान पंतप्रधानांवर (PM Narendra Modi)भाष्य करताना उद्धव ठाकरे म्हणाले,’सर्वोच्च न्यायालयाचा निकाल बाकी असताना देखील, आपली शिवसेना, म्हणजे माझ्या शिवसेनेला जी शिवसेना बाळासाहेबांनी स्थापन केली, ज्याचं नाव माझ्या आजोबांनी ठेवलं, तिला ‘नकली शिवसेना’ म्हणतायत. यावरून कळत कि निवडणूक आयोग त्यांचा नोकर आहे. लवादानेसुद्धा ते म्हणतील तस काम केलेलं आहे. आता सर्वोच्च न्यायालयाने देखील आम्हाला हे नाव आणि चिन्ह देऊ नये असा अप्रत्यक्ष दबाव ते निवडणूक आयोगावरती आणतात कि काय असा प्रश्न पडलेला आहे.’

पुढे ते म्हणाले, “उद्धव ठाकरेंना विरोधक अभिमन्यू म्हणतायत तर म्हणूदेत. अभिमन्यू हा शूर होता भेकड नव्हता. आज ईडी, सीबीआयच्या माध्यमातून चक्रव्यूह टाकणारे लोक भेकड आहेत. हे बाहेरच्या बाहेर भाडोत्री लोकांना एकमेकांमध्ये लढवतायत. म्हणजे शिवसेना फोडून त्यात मारामाऱ्या लावण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादी फोडली. कुटुंबात कलह निर्मण करून कुटुंब फोडतायत. पक्षांमध्ये भांडण लावण्याचं काम करतायत. हे काम तर कौरवांचंच आहे ना? हि जी कौरवणीती आहे. ती शेवटी हरणार आहे. कारण कौरव त्यावेळेला शंभर होते पण पांडव पाचच होते. पण पाच पांडवांनी शंभर कौरवांवरती मत केली होती. कारण पांडव हे सत्याच्या आणि धर्माच्या बाजूने होते. म्हणून स्वतः श्रीकृष्ण सुद्धा पांडवांच्या बाजूने होता.”

पुढे ते म्हणाले, “दोन महत्वाचे मुद्दे आहेत एक म्हणजे गेल्या दहा वर्षांत मी मुद्दामहून आता मोदी सरकार असा उल्लेख करतोय. कारण मला मोदी सरकार नको आहे. मला भारत सरकार हवं आहे. मोदी आता संपूर्ण राज्यभर फिरतायत मला तर असं वाटतंय मोदी एखाद्या गल्लीबोळातील रोड शो देखील करतील. आणि त्यांनी तो करावा. महाराष्ट्र कसा आहे? महाराष्ट्राचा आक्रोश आणि संताप त्यांनी अनुभवायला हवा.”

हे ही वाचा:

लोकशाहीचं वस्त्रहरण होतंय, Uddhav Thackeray यांची विरोधकांवर टीका

Rahul Gandhi यांनी स्वीकारलं PM Modi यांच्यासोबत जाहीर चर्चेचं आव्हान !

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss