spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

वसंत मोरेंनी रामराम ठोकला यावर मी काय बोलू? Sanjay Raut यांची भूमिका काय?

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मनसेला जय महाराष्ट्र केला आहे. त्यांनी केलेल्या सोशल मीडिया पोस्टमुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले. वसंत मोरे यांनी आज पत्र लिहीत मनसे पक्षाचा राजीनामा दिला. प्राथमिक सदस्य आणि इतर सर्व पदाचा (Pune Vasant More Resignation) राजीनामा देत सोशल मीडियावरून त्यांनी पत्र शेअर केले आहे. याबाबत, खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.

नाशिक येथे माध्यमांशी संवाद साधतांना खासदार संजय राऊत म्हणाले की, वसंत मोरेंनी  रामराम ठोकला यावर मी काय मत व्यक्त करू? त्यांनीच मत व्यक्त केले पाहिजे की त्यांनी  रामराम का ठोकला ? लोकसभा लढवणार आहे असे ते म्हणाले असले, तरीही कुठून लढणार आहेत हे त्यांनी स्पष्ट केले नाही. फक्त त्यांनी वॉशिंग मशिंगच्या दिशेने जाऊ नये, एवढीच इच्छा असल्याचे खासदार संजय राऊत म्हणाले. रवींद्र धांगेकर यांच्यासारखे वसंत मोरे हे  चांगले कार्यकर्ते आहेत. त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली त्यात काही वाईट नाही, कारण शरद पवार हे देशाचे नेते आहेत. त्यांच्यासोबत भेट घेतली असेल तर त्यातून त्यांनी काहीतरी चांगलं घ्यावं, असेही संजय राऊत म्हणाले.

काही दिवसांपूर्वी संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले होते, महाविकास आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. मात्र वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोठा खुलासा केला की, महाविकास आघाडीमध्ये आप-आपसात मतभेद असल्याने जागा वाटप रखडले आहे. त्यामुळे त्यांनी आधी मतभेद मिटवावे. आपल्याला मोदींना हरवण्यासाठी लढायचं आहे, काँग्रेसने त्यांचा इगो बाजूला ठेवावा. यासोबतच, संजय राऊत खोटं बोलतात, असा हल्लाबोल सुद्धा प्रकाश आंबेडकर यांनी केला. यावर खासदार संजय राऊत म्हणाले की, संजय राऊत कधीच खोटं बोलत नाही. मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला मानणारा नेता आहे. ते सत्य मानणारे होते आणि मी सत्य सांगतो. हुकूमशाहीचा पराभव करण्यासाठी त्यांनी महाविकास आघाडीत यावे. संविधान टिकवून ठेवण्यासाठी मी जर बोलत असेल तर यावर माझ्याकडे उत्तर नसल्याचे खासदार संजय राऊत यांनी  सांगितले.

हे ही वाचा:

टेलिव्हिजन विश्वात स्पृहा जोशीचे कमबॅक,झळकणार नव्या मालिकेत

अमरावतीमध्ये प्रवेशद्वाराच्या मुद्द्यावरुन जमावाने केलेल्या दगडफेकमध्ये २५ जणांवर गुन्हा दाखल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss