Pankaja Munde या लोकसभा निवडणूक लढणार की नाही…, पहिली प्रतिक्रिया आली समोर

राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत असल्याचं चित्र सध्या समोर येत आहेत. त्यात आता लवकरच राज्यसभा आणि लोकसभा यांच्या निवडणुका या येणार आहेत.

Pankaja Munde या लोकसभा निवडणूक लढणार की नाही…, पहिली प्रतिक्रिया आली समोर

राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत असल्याचं चित्र सध्या समोर येत आहेत. त्यात आता लवकरच राज्यसभा आणि लोकसभा यांच्या निवडणुका या येणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष हे तयारीला लागले आहेत. अश्यातच भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना बीडमधून लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याची भाजपची तयारी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

प्रीतम मुंडे यांच्या जागी पंकजा मुंडे यांना लोकसभा निवडणुकीचं तिकिट मिळू शकतं. तर पंकजा यांनी लोकसभेची निवडणूक लढल्यास धनंजय मुंडे त्यांचे स्टार प्रचारक म्हणून काम पाहतील, अशी माहिती आहे. यावर पंकजा मुंडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आज मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत असताना पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत की, तुम्ही लोकसभा निवडणूक लढणार की विधानसभा? आणि विधानसभा लढण्यास पुन्हा तुमचे बंधू धनंजय मुंडे यांच्यासोबत तुमचा सामना होण्याची शक्यता आहे, यावर तुमची प्रतिक्रिया काय? असं विचारलं असता आम्ही हे सामने ऑलरेडी करून झालेलो आहोत. मुंडे साहेबांची २००४, २०१४ प्रीतम ची २०१४ ची निवडणूक आम्ही विरोधात लढलोय. त्याचा अनुभव घेऊन झाला आहे. आता पाहू काही वेगळा अनुभव वाटायला येतोय का ते…, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

पूर्ण मी संघटनेच्या रोलमध्ये आहे. प्रीतम मुंडे दहा वर्षे खासदार राहिल्या आहेत. त्यांनी चांगलं काम केलं. राष्ट्रवादीसोबत युती झाल्यामुळे माझ्या मतदारसंघावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. मी राज्यातच नव्हे देशात स्टार प्रचारक राहिलेले आहे. त्यामुळे माझ्या लोकसभेच्या उमेदवार कोणी असो स्टार प्रचारक आणि सर्व जबाबदारी माझी असेल. भविष्यात राष्ट्रवादीची युती असेल त्यांचे स्टार प्रचारक कोण असेल ते त्यांचे ठरवतील. भारतीय जनता पार्टीचे निर्णय दिल्लीत होतात. तिथे आम्हीच पोहोचू शकतो, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

हे ही वाचा:

Exclusive :रविंद्र वायकरांवर पक्ष सोडायला कोणी दबाव आणला? सेनानेत्याचा Political Encounter!

PM Narendra Modi यांच्या हस्ते देशाच्या भविष्याची पायाभरणी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version