spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Ujjwal Nikam यांच्यासाठी Yogi Adityanath मैदानात, मुंबईत रोड शो

लोकसभा निवडणुकीचे (Loksabha Election 2024) वारे संपूर्ण देशभरात वाहत आहे. निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडला असून अजून तीन टप्पे पार पडणे बाकी आहेत. २० मे ला पाचवा टप्पा पार पडणार असून त्यात मुंबईचाही (Mumbai) समावेश आहे.

लोकसभा निवडणुकीचे (Loksabha Election 2024) वारे संपूर्ण देशभरात वाहत आहे. निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडला असून अजून तीन टप्पे पार पडणे बाकी आहेत. २० मे ला पाचवा टप्पा पार पडणार असून त्यात मुंबईचाही (Mumbai) समावेश आहे. आपल्या पक्षाचा प्रचार करण्यासाठी सगळेच उमेदवार सज्ज झाले आहे. २० मे रोजी मतदान असल्याने १८ मे ला प्रचाराच्या तोफा थंडावतील. अवघ्या काही दिवसांचा अवधी उरला आहे. कालच पंतप्रधानांनी (PM Narendra Modi) वाराणसी (Waranasi) येथून उमेदवारीचा अर्ज भरला. आज २ ते ५ या दरम्यान घाटकोपर (Ghatkopar) येथून रोड शो होणार असून नाशिक (Nashik)मध्ये त्यांची प्रचारसभा पार पडली. आता पंतप्रधान मोदींमागोमाग योगी आदित्यनाथ (Yogi aadityanath) यांचाही रोड शो मुंबईत होणार असून उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam)यांच्या प्रचारार्थ ते मुंबईत आहे. आज मुंबईतील घाटकोपर येथील रोड शो पार पडल्यानंतर १७ मे रोजी शिवाजी पार्क (Shivaji Park Mumbai)मध्ये पुन्हा मोदींची सभा होणार आहे.

यावर्षी उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकम हे उमेदवारी लढवणार आहेत. त्यांच्याच प्रचारार्थ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हा रोड शो करणार आहेत. कुर्ला येथे १८मे रोजी हा रोड शो होणार आहे. मोदींनंतर आता योगी आदित्यनाथही रोड शोच्या मैदानात उतरत असल्याचे दिसत आहे. उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकम यांच्या विरुद्ध वर्षा गायकवाड (Varsha GAikwad) काँग्रेसकडून ही निवडणूक लढवणार आहेत. वर्षा गायकवाड अनुभवी राजकारणी असून त्या पूर्वी शिक्षणमंत्री होत्या. गेल्या अनेक वर्षांपासून त्या मुंबईत राजकारण करत आहेत. त्यामुळे ही चुरशीची लढत असणार आहे.’

हे ही वाचा:

Latest Posts

Don't Miss