सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार पगारवाढ; महागाई भत्ता ४% वाढणार

महागाई भत्त्यात 4% वाढ जाहीर करू शकते. सतत वाढत चाललेली महागाई लक्षात घेता केंद्र सरकार डीए वाढवण्याचा निर्णय घेऊ शकते.

सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार पगारवाढ; महागाई भत्ता ४% वाढणार

‘पगारवाढ ’प्रत्येक नोकरदार व्यकतीच्या चेहऱ्यावर हास्य उमटविणारा शब्द. त्यात सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढी्वर नेहमीच सर्वांचं लक्ष केंद्रित असते. तर सध्याच्या काळात शासन सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा निर्णय घेण्याच्या शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे. केंद्र सरकार पुढील महिन्यात महागाई भत्त्यात 4% वाढ जाहीर करू शकते. सतत वाढत चाललेली महागाई लक्षात घेता केंद्र सरकार डीए वाढवण्याचा निर्णय घेऊ शकते.DA किंवा महागाई भत्ता वर्षातून दोनदा जानेवारी आणि जुलैमध्ये बदलला जातो.

अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक (AICPI) च्या आधारावर DA बदलला जाऊ शकतो. मार्चमध्ये केंद्र सरकारने सातव्या वेतन आयोगांतर्गत महागाई भत्त्यात (डीए) 4 टक्के वाढ मंजूर केली होती. सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता मूळ उत्पन्नाच्या 34 टक्क्यांवर पोहोचला आहे. सरकारच्या या निर्णयाचा फायदा 50 लाख कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारकांना झाला. जर सरकारने पुन्हा एकदा महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ जाहीर केली तर ती मूळ वेतनाच्या 38 टक्क्यांपर्यंत पोहोचेल. शासनाने जर महागाई भत्ता वाढवला तर त्याचा सरकारी कर्मचारी व निवृत्त कर्मचाऱ्यांना देखील फायदा होणार आहे.

मूळ वेतन 56,900 रुपये असेल त्यांना 38 टक्के महागाई भत्ता असेल तर त्यांना 21,622 रुपये डीए मिळेल. सध्या 34 टक्के डीए दराने 19,346 रुपये मिळत आहेत. डीएमध्ये 4 टक्क्यांनी वाढ केल्याने पगारात 2,276 रुपयांची वाढ होईल.मीडिया रिपोर्ट्सनुसार, जानेवारी 2020 ते जून 2021 या कालावधीतील 18 महिन्यांच्या डीए थकबाकीचा मुद्दा लवकरच सोडवला जाऊ शकतो आणि केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांना 2 लाख रुपयांची एकवेळची थकबाकी देखील मिळू शकते.

 

Exit mobile version