spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

नाशिककर आणि दिंडोरीकर Mahayuti च्या कामाची पोचपावती देतील, CM Eknath Shinde यांचा विश्वास

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल (गुरुवार, २ मे) नाशिक मतदारसंघातून हेमंत गोडसे आणि दिंडोरी मतदारसंघातून भारती पवार यांच्या निवडणूक अर्ज भरण्यापूर्वीच्या रॅलीत सहभाग घेतला .

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काल (गुरुवार, २ मे) नाशिक मतदारसंघातून हेमंत गोडसे (Hemant Godse) आणि दिंडोरी मतदारसंघातून भारती पवार (Bharati Pawar) यांच्या निवडणूक अर्ज भरण्यापूर्वीच्या रॅलीत सहभाग घेतला . यावेळी, माध्यमांशी बोलताना त्यांनी महायुतीचे दोन्ही उमेदवार प्रचंड मताधिक्क्याने विजयी होतील अश्या भावना व्यक्त केल्या.

यावेळी बोलताना ते म्हणाले, “अर्ज भरायला महायुतीची प्रचंड अशी रॅली आपण पाहिली. महायुतीचे दोन्ही उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होतील. नाशिककरांनी हा निर्धार केलेला आहे. महायुतीचे सर्व पदाधिकारी, नेते कार्यकर्ते आज रॅलीमध्ये कडाक उन्हातही रॅलीमध्ये सहभागी झाले होते. यावरून आपण अंदाज लावू शकता की हेमंत गोडसे आणि भारती पवार प्रचंड मताधिक्याने विजयी होतील असा आम्हाला विश्वास आहे. काँग्रेसला जे 50 -60 वर्षात काम करता आलं नाही ते मोदींनी दहा वर्षात केलं. देशाला विकासाकडे नेण्याचे काम केलं. राज्यात महायुती सरकारने देखील सर्वसामान्यांसाठी जे काम केलंय त्याची पोचपावती या निवडणुकीत नाशिककर आणि दिंडोरीकर देतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

ठाणे, कल्याण आणि नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवार ठरवण्यासाठी महायुतीला एवढा विलंब का लागला? या प्रश्नाचे उत्तर देत ते म्हणाले, “आमच्याकडे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही महायुती काम करत नाही. निवडणुका आल्या मग काम करायचं असं नाही, आम्ही २४ तास काम करतो. महायुतीचे सर्व कार्यकर्ते फक्त निवडणुकीपुरता काम करत नाही. फक्त घरी बसून काम करत नाही फेसबुक लाईव्ह करत नाही. त्यामुळे आमचं काम 24 तास सुरू असतं. आमचे कार्यकर्ते २४ तास काम करणारे लोकांच्या मदतीला धावून जाणारेआहेत. फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करणारे ते नाहीत. निवडणुका असू द्या किंवा नसू द्या सतत काम करणारे आमचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे विजय आमचा पक्का आहे.”

ठाणे लोकसभा मतदारसंघातून नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांच्या नावाची घोषणा करताच महायुतीमधील कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. भाजप समर्थकांनी याला उघडउघड विरोध दर्शवत नरेश म्हस्के यांचा प्रचार करणार नाही अशी भूमिका देखील घेतली. याबाबत बोलताना ते म्हणाले, “तुमच्याकडे अर्धवट माहिती आहे. आता नरेश म्हस्के. प्रताप सरनाईक आणि आमचे लोक संजीव नाईक यांना भेटले. त्यांच्याशी चर्चा झालेली आहे, त्यामुळे महायुतीचं काम सर्व लोक करतील. या देशाच्या राज्याच्या विकासासाठी आम्ही महायुती केली. महायुतीत प्रत्येक जण इच्छुक असतोच इच्छा असते, मात्र एकदा महायुतीने निर्णय घेतला की सर्वजण महायुतीसाठी काम करतात.”

हे ही वाचा:

Naresh Mhaske यांच्या उमेदवारीवरून BJP कार्यकर्ते आक्रमक

PM Modi देशासमोरच संकट नसून विरोधकांसमोरच संकट, Devendra Fadnavis यांचे वक्तव्य

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss