शाहरुख खान : पाच वर्षांच्या ब्रेकनंतर किंग खानचे आगमन

शाहरुख खान : पाच वर्षांच्या ब्रेकनंतर किंग खानचे आगमन

आज बॉलीवूडचे किंग खान म्हणजेच शाहरुख खान यांचा ५७ वा वाढदिवस आहे,तर वाढदिवसानिमित्त शाहरुख खान यांचा पठाण (Pathaan)चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. या चित्रपटात शाहरुख खान यांच्या सोबत , दीपिका पादुकोण व अभिनेता जॉन अब्राहम हे सुद्धा आहेत. पठाण हा चित्रपट २५ जानेवारी २०२३ ला प्रदर्शित होईल .

शाहरुख खान हा जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. शाहरुख खान हा अभिनेताच नाही तर मोठा उद्योजक सुद्धा आहे. याच कारणामुळे गेले पाच वर्षे शाहरुख खानने चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारली नाही. शाहरुख खान यांनी २०१८ मध्ये आलेल्या झिरो (Zero) या चित्रपटात शेवटची भूमिका साकारली होती त्यानंतर त्यांनी ए दिल है मुश्किल (Ae Dil Hai Mushkil) नंतर ब्रम्हास्त्र (Brahmāstra) मध्ये दुय्यम स्थानच्या भूमिका साकारल्यात पण आता शाहरुख खान पठाण या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे . कक्कर यांनी सांगितले कि “एसआरकेने त्याच्या अभिनय कारकिर्दीबाहेरही त्याच्यासाठी बर्‍याच गोष्टी केल्या आहेत. त्याला काळजी करण्यासारखे काही नाही. कारण ते कधीही काळजी करत नाहीत किंवा निराश होण्याची गरज नाही, त्यांचा ब्रँड पुरेसा असेल,”

पठाण या चित्रपटात “शाहरुख खान हे रॉ एजेंट फिरोज” या भूमिकेत आहे तर त्यांच्या बरोबर दीपिका पादुकोण “मेहेक खान” या भूमिकेत दिसणार आहे आणि जॉन अब्राहम साबीर अन्सारी या भूमिकेत दिसणार आहे हा चित्रपट २५ जानेवारी रोजी प्रकाशित होणार असून विशेष म्हणजे या चित्रपटाच्या टीझरच्या शेवटी सलमानखान ला पाहण्यात आले आहे . त्यामुळे शाहरुख खान आणि सलमानखान याना बऱ्याच मोठ्या काळानंतर चित्रपटात एकत्रित दिसणार आहेत.

हे ही वाचा:

Maharashtra Kesari : राज्यात ‘राजकीय कुस्तीचा’ सामना रंगणार, ठाकरेंना विरोध करणारा युपीचा खासदार महाराष्ट्र दौऱ्यावर

Raj Thackeray: मुख्यमंत्री शिंदे-राज ठाकरे अन् ‘वीर दौडले सात’!

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version