Monday, September 30, 2024

Latest Posts

सकल आदिवासी समाजाच्या वतीने राज्यभरात रास्ता रोको आंदोलन, धनगर समाजाला आरक्षण न देण्याची मागणी

धनगर समाजाला आदिवासी जमातीमध्ये समाविष्ट करु नये या मागणीसाठी आज (सोमवार, ३० सप्टेंबर) राज्यभरात विविध ठिकाणी आदिवासी बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केले आहे. धनगर समाजाला आदिवासी जमातींमध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी धनगर समाज आक्रमक झाला असून धनगर समाजाकडून राज्यभरात आंदोलने करण्यात येत आहे. आता आदिवासी समाजाने धनगर समाजाच्या मागणीला कडाडून विरोध केल्याचे दिसून येत आहे. म्हणूनच राज्यभरात धनगर समाज रस्त्यावर उतरल्याचे चित्र आज सकाळपासून दिसत आहे.

धनगर समाज हा धनगड या जमातीच्या नावाशी असलेल्या साधर्म्यावरून गेल्या अनेक वर्षांपासून वेळोवेळी मोर्चे, आंदोलन, उपोषण करुन धनगर समाजाला आदिवासी मध्ये समाविष्ट करण्यात यावे अशी मागणी करत आहे. मुख्यमंत्री यांनी धनगर समाजाला आदिवासी मध्ये समाविष्ट करण्यात येणार असल्याचे जिआर काढण्याचे सांगत त्यांनी तमाम महाराष्ट्रातील आदिवासी समाजाच्या भावनेशी खेळणारा असा निर्णय घेतला असून हा निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा अशी मागणी करत आदिवासी बांधवांनी राज्यभरात रास्ता रोको आंदोलन केले आहे. यावेळी राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली आहे.

धुळ्यात बोगस आदिवासी विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

आदिवासी जात जमातीमध्ये बोगस अधिवासींची संख्या ही दिवसेंदिवस वाढत असून,यामध्ये धनगर समाजाला देखील आदिवासींमध्ये समाविष्ट करण्यासाठी काही प्रशासकिय अधिकारी प्रयत्न करीत आहे. तसेच आदिवासी विरोधात वक्तव्य करणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकर यांचा निषेध म्हणून आज धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे विविध आदिवासी संघटनांनी एकत्र येत रास्ता रोको आंदोलन केले.

प्रशासकीय आदिवासी विभागाच्या महत्वाच्या पदावर जे अधिकारी आपली मनमानी कारभार चालवत आहे अश्या अधिकाऱ्यांना हटविण्यात यावे. तसेच मुळ अधिवासी समाजात बोगस अधिवासींचा समावेश झाला आहे, त्यांना आदिवासी बांधवाना मिळणाऱ्या शासकिय लाभ मिळू नये तसेच धनगर जातीला आदिवासींचे आरक्षण दिले जाऊ नये. तसेच आदिवासींचा अपमान करणारे वक्तव्य आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले यावरू आदिवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील त्यांचा आपल्या शब्दात चांगलाच समाचार यावेळी घेत आपल्या विविध मागण्या घेऊन हा रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

बुलढाण्यात आदिवासींनी समाजाचा रास्ता रोको

धनगर समाजाला आदिवासी जमातीमध्ये समाविष्ट करु नये या मागणीसाठी आज बुलढाण्यातील जयस्तंभ चौकात आदिवासी बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केले आहे. धनगर समाज हा धनगड या जमातीच्या नावाचा गैरफायदा घेत गेल्या अनेक वर्षांपासून वेळोवेळी मोर्चे, आंदोलन, उपोषण करुन धनगर समाजाला आदिवासी मध्ये समाविष्ट करण्यात यावे अशी मागणी करत आहे. मुख्यमंत्री यांनी धनगर समाजाला आदिवासी मध्ये समाविष्ट करण्यात येणार असल्याचे जिआर काढण्याचे सांगत त्यांनी तमाम महाराष्ट्रातील आदिवासी समाजाच्या भावनेशी खेळणारा असा निर्णय घेतला असून हा निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केले आहे. यावेळी राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली आहे.

गोंदियात आदिवासी बांधव उतरले रस्त्यावर

धनगर समाजाचा अनुसूचित जमाती (ST) मध्ये समावेश व्हावा, यासाठी राज्यभर धनगर समाज उपोषण-आंदोलन करत रस्त्यावर उतरला आहे. एकीकडे धनगर समाज तीव्र आंदोलन करत अनुसूचित जमातीमध्ये समावेशाची मागणी करत असताना आता आदिवासी समाज अनुसूचित जमातीच्या आरक्षणाला धक्का लावू नये यासाठी आक्रमक झाला आहे. आदिवासी बहुल जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यामध्ये हजारो आदिवासी बांधव रस्त्यावर उतरले असून आदिवासी समाजाच्या आरक्षणात घुसखोरी खपवून घेतली जाणारा नाही असे म्हणत गोंदिया शहरातून आक्रोश मोर्चा काढत धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करू नये अशी मागणी आदिवासी समाज बांधवांनी केली आहे.

नाशिक मुंबई महामार्गावर आदिवासी संघटनांकडून रास्ता रोको

आदिवासी मधून धनगर समाजाला आरक्षण नको म्हणून आज विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ एकीकडे मुंबईमध्ये धरणे आंदोलन करत असताना दुसरीकडे आदिवासी संघटना देखील आक्रमक झाले आहेत. आज नाशिक मुंबई महामार्गावर आदिवासी संघटनांकडून रास्ता रोको आंदोलन करत धनगरांना आदिवासी मधून आरक्षण नको ही मागणी केली. या आंदोलनामुळे काही काळ नाशिक मुंबई महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. सरकारने आमची मागणी मान्य केली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.

नांदेडमध्ये सकल आदिवासी समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

आज नांदेडमधील हदगाव तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या तामसा येथे आदिवासी समाजाकडून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. सरकारने धनगर समाजाला आदिवासीतून आरक्षण देण्याचा जीआर काढण्याची भूमिका मागे घ्यावी, या मागणीसाठी हा रास्ता रोको करण्यात आला. तसेच आमदार नरहरी झिरवाळ यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नसून त्यांना जे साडेतीन टक्के आरक्षण दिले आहे त्यातून सुविध्या द्यावात अशी मागणी आदिवासी समाज बांधवांनी केली आहे.

हे ही वाचा:

सिनेट निवडणुकीप्रमाणे विधानसभेतही असाच विजय मिळवायचा आहे: Aaditya Thackeray

संविधानावरचा धोका अद्याप टळला नाही हे Prakash Ambedkar यांना सांगायची गरज नाही: Sanjay Raut

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss