spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

दहावी-बारावीचे वेळापत्रक झाले जाहीर, या तारखेपासून होणार परीक्षेला सुरुवात

दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शुक्रवारी (ता. ३०) जाहीर केले आहे.

कोरोनाकाळानंतर आता पहिल्यांदाच नव्या वर्षात म्हणजेच २०२३ मध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुन्हा पूर्वीप्रमाणे घेण्यात येणार आहेत. दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शुक्रवारी (ता. ३०) जाहीर केले आहे. भाषा विषय वगळता सर्वच विषयांसाठी विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वेळ देण्यात आला आहे. जाहीर केलेले वेळापत्रक पाहता त्यात प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षा दोन्हींच्या तारखा नमूद करण्यात आल्या आहेत. जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार बारावीचे प्रात्यक्षिक १ ते २० फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. त्यानंतर २१ फेब्रुवारीपासून लेखी परीक्षा सुरु होईल. तर दहावीचे प्रात्यक्षिक १० फेब्रुवारी ते १ मार्च या वेळेत होईल. २ मार्चपासून दहावीची लेखी परीक्षा सुरु होणार आहे.

या वेळेची बोर्डाची परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार असून पूर्वीप्रमाणेच परीक्षेच्या केंद्रांवर जाऊन विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागणार आहे. कॉपीमुक्त परीक्षेसाठी भरारी पथके असतील. दरम्यान, भयमुक्त, तणावमुक्त वातावरणात विद्यार्थ्यांना परीक्षा देता येईल, यादृष्टीने बोर्डाचे वेळापत्रक बनविण्यात आले आहे. विज्ञान शाखेतील परीक्षार्थींसाठी दोन पेपरमध्ये ठरावीक दिवसांचे अंतर ठेवण्यात आले आहे.

भाषा विषयांना तितकासा वेळ नसणार आहे. लेखी परीक्षेला आणखी दोन महिन्यांचा अवधी असल्याने विद्यार्थ्यांनी नियोजनबद्ध अभ्यास करावा. प्रात्यक्षिक परीक्षा व्यवस्थित द्यावी. दरम्यान, विद्यार्थ्यांनी सोशल मिडियावरील कोणत्याही वेळापत्रकावर विश्वास न ठेवता बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावरील वेळापत्रक पाहावे, असे आवाहन बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी व सचिवा अनुराधा ओक यांनी केले आहे. विद्यार्थी https://www.mahahsscboard.in या संकेतस्थाळवर जावून वेळापत्रक पाहू शकतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

दहावीचे वेळापत्रक
  • मराठी : २ मार्च
  • इंग्रजी : ६ मार्च
  • हिंदी : ८ मार्च
  • बिजगणित : १३ मार्च
  • भूमिती : १५ मार्च
  • विज्ञान भाग १ : १७ मार्च
  • विज्ञान भाग २ : २० मार्च
  • इतिहास व राज्यशास्त्र : २३ मार्च
  • भूगोल : २५ मार्च
बारावीचे वेळापत्रक
  • इंग्रजी : २१ फेब्रुवारी
  • हिंदी : २२ फेब्रुवारी
  • मराठी : २३ फेब्रुवारी
  • भौतिकशास्त्र : २७ फेब्रुवारी
  • रसायनशास्त्र : १ मार्च
  • जीवशास्त्र : ८ मार्च
  • भूगोल : १७ मार्च

हे ही वाचा:

नागपूरमधील हिवाळी अधिवेशन सर्वांच्या तोंडाला पाने पुसणारे! नाना पटोलेंचा खोचक टोला

नागराज मंजुळेंचा ‘घर बंदुक बिर्याणी’ चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss