दहावी चा निकाल जाहीर; कोकण विभाग पहिल्या क्रमांकावर

दरवर्षीप्रमाणे राज्यात कोकण विभाग पहिल्या क्रमांकावर आहे. कोकण विभागाचा सर्वाधिक 99.27 टक्के निकाल लागला आहे. 

दहावी चा निकाल जाहीर; कोकण विभाग पहिल्या क्रमांकावर
अनेक दिवसांपासून मुलांना निकालाची उत्सुकता होती तर आज दहावी चा निकाल जाहीर झालेला आहे. यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली आहे. राज्यात एकूण 96.94 % निकाल लागला असून यामध्ये 95.96% मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. त्याचबरोबर दरवर्षीप्रमाणे राज्यात कोकण विभाग पहिल्या क्रमांकावर आहे. कोकण विभागाचा सर्वाधिक 99.27 टक्के निकाल लागला आहे.
कोल्हापूर विभाग दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोल्हापूर विभागाचा निकाल 98.50 टक्के लागला आहे. निकालांमध्ये पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचा निकाल 97.96 टक्के तर मुलांचा निकाल 96.06 टक्के लागला आहे. सर्वच विभागांमध्ये  मुलींनी बाजी मारली आहे. दहावीच्या नियमित विद्यार्थ्यांचा एकूण निकाल 96.94 टक्के इतका लागला आहे.
कोरोना महामारीमुळे यंदा 75 टक्के अभ्यासक्रमावरच दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. राज्यातल्या तब्बल 22 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळालेले आहेत.  मुलांना 100 टक्के गुण मिळणं खरं तर शिक्षण विभागासह, राज्यासाठी अभिमानाची बाब आहे. पण यातच आनंद आहे का? खरी चिंता आहे ती त्या शाळांची ज्या शाळांचा शून्य टक्के निकाल लागलेला आहे. अशा शाळांची संख्या एकूण 29 असणं ही फारच चिंतेची बाब आहे.
Exit mobile version