खारघर दुर्घटनेत मृत पावलेले १४ पैकी १२ श्री सदस्य ७ तास होते उपाशी

Maharashtra Heat Stroke Death : निरूपणकर अप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना रविवारी नवी मुंबई (Navi Mumbai) येथील सेंट्रल पार्क मैदानावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्काराने (maharashtra bhushan puraskar) गौरवण्यात आले.

खारघर दुर्घटनेत मृत पावलेले १४ पैकी १२ श्री सदस्य ७ तास होते उपाशी

Maharashtra Heat Stroke Death : निरूपणकर अप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना रविवारी नवी मुंबई (Navi Mumbai) येथील सेंट्रल पार्क मैदानावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्काराने (maharashtra bhushan puraskar) गौरवण्यात आले. हा पुरस्कार देण्यात आला होता. परंतु या कार्यक्रमादरम्यान काळाने घात केला. या गौरव सोहळ्यासाठी लाखोंच्या संख्येने श्री सदस्य खारघर येथे जमले होते.

भर दुपारी पुरस्कार गौरव सोहळा आयोजित केल्याने उष्माघातामुळे १४ जणांचा मृत्यू झाला आणि या सोहळ्याला डाग लागला. या दुर्घनेत मृत पावलेल्या १४ पैकी १२ जणांनी सुमारे सहा ते सात तासांपासून काहीच खाल्लं नसल्याची माहिती पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आली आहे.

दुसरी गोष्ट म्हणजे या मृत पावलेल्या श्री सदस्यांपैकी काहींना पूर्वीपासूनच अनेक व्याधी होत्या. त्यात वेळवर काही न खाल्ल्याने व त्यात उन्हाची भर पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. उन्हात बसलेल्या लोकांना सावलीची आवश्यकता होती असं पोस्टमार्टम करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं. ही दुर्घटना ज्या दिवशी घडली त्यादिवशी तापमान ३९ – ४१ अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले होते त्यामुळे शरीरातील पाणी कमी झालं, सोबतच रक्तातील प्रोटीन्सवर या उष्णतेचा परिणाम देखील झाला.

खारघर येथील महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यानिमित्त घडलेल्या या दुर्घटनेनंतर उष्माघात किती भयानक आहे हे आख्या जगाने पाहिलं. उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे उष्माघाताला बळी पडून मृत पावणाऱ्यांची संख्या रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने संपूर्ण देशासाठी एकसारखा हिट ऍक्शन प्लॅन तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. याकरिता नागपुरातील विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेला (VNIT) सोपवण्यात आली आहे.

हे ही वाचा : 

छ. संभाजी महाराजांचे अधिकृत छायाचित्र लवकरच महाराष्ट्रासमोर येणारं

Rahul Gandhi यांना सुरत कोर्टाने दिला मोठा धक्का, काँग्रेसची हायकोर्टात धाव

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version