मुंबई विमानतळावर १२ प्रवाश्यांना सोन्याची तस्करी करताना रंगे हात पकडल

मुंबई विमानतळावर १२ प्रवाश्यांना सोन्याची तस्करी करताना रंगे हात पकडल

मुंबई छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर कस्टम विभागाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये कस्टम विभागाने तब्ब्ल १२ किलो सोनं जप्त केलं आहे. हे १२ किलो सोनं १२ सोन्याच्या बिस्किटांच्या रुपात जप्त करण्यात आलं आहे. जप्त केलेल्या या सोन्याची एकूण किंमत ५ कोटी रुपयांपेक्षाही अधिक असल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणात पोलिसांनी ६ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर इतर ६ प्रवाशांना हद्द पार करण्यात आले आहे. छुप्या पद्धतीने सोन्याची तस्करी करण्याच्या गुन्ह्यात एका परदेशी नागरिकाला अटक केल्याची माहिती मिळत आहे.

प्राथमिक माहितीनुसार, कस्टम विभागाला संशय आल्याने एका प्रवाश्यांची तपासणी करण्यात आली. या वेळी एक खास डिझाईन केलेला बेल्ट परिधान केला होता. अधिकाऱ्यांनी त्या बेल्टची तपासणी केली असल्यास त्यातून १२ सोन्याची बिस्किटं आढळून आली. ज्याचं एकूण वजन १२ किलो होतं. याप्रकरणी ६ जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या १२ किलो सोन्याची एकूण किंमत ५ कोटी ३८ लाख असल्याची माहिती आहे. पोलिसांनी हे १२ किलो सोनं जप्त केलं आहे. कस्टम अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे काही प्रवाश्यांकडून सोनं तस्करी करण्याचा प्रयत्न सुरु होता पण कस्टम विभागाने हा डाव पूर्णपणे फोडून काढला आहे.

दिल्लीतील राष्ट्रवादी अधिवेशनात शरद पवारांचा भाजपावर निशाणा म्हणाले, …झुकणार नाही

हे सोने विशेषत: गुन्हा करण्यासाठी डिझाइन केलेल्या एका लाल रंगाच्या पट्ट्यात लपवले होते आणि तो पत्ता एका प्रवाशाने घातला होत्या. जेव्हा प्रवाशांची तपासणी सुरु होती त्या वेळी काही प्रवाशांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. या गोंधळामध्ये लाल पट्टा घातलेली व्यक्ती कस्टम विभागाच्या डोळ्यात धूळ फेकून पळण्याचा प्रयत्न करत होता पण तो त्यात अयशस्वी झाला आणि कॉस्टम विभागाने त्याला रंगे हात पकडले. सप्टेंबरच्या सुरुवातीला, मुंबई विमानतळ सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी ₹ १३ कोटी किमतीचे १.३ किलो कोकेन जप्त केले होते.

हे ही वाचा:

शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांचे निधन, वयाच्या ९९व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

रणवीर सिंगने पुष्पा मधील अल्लू अर्जुनचे श्रीवल्ली गाणे केले ‘रिक्रिएट’, SIIMA 2022 च्या मंचावरील व्हिडिओ होतोय व्हायरल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version