spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मालकारपूरमध्ये २ बसचा भीषण अपघात, ७ जणांचा जागीच मृत्यू, तर…

मलकापूर शहरामध्ये भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना समोर आली आहे. दोन बसची समोरासमोर येऊन धडक झाल्याने हा अपघात घडला.

मलकापूर शहरामध्ये भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना समोर आली आहे. दोन बसची समोरासमोर येऊन धडक झाल्याने हा अपघात घडला. या अपघातात सात प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर यातील २५ ते ३० जण गंभीर जखमी झाले आहेत. यामधील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही घटना आज २९ जुलै रोजी पहाटेच्या तीन वाजण्याच्या सुमारास लक्ष्मी नगर उड्डान पुलावर घडली आहे .

मिळालेल्या माहितीनुसार एम एच ०८. ९४५८ ही अमरनाथची तिर्थयात्रा करुन ही बस हिंगोलीच्या दिशेने जात होती. या ट्रॅव्हल्समध्ये ३५ ते ४० तिर्थयात्री होते. तर एम.एच २७ बी.एक्स. ४४६६ या ट्रॅव्हल्समध्ये २५ ते ३० प्रवाशी होते. ही बस नागपूरवरुन नाशिकच्या दिशेने जात असताना मलकापूर शहरातून जाणाऱ्या महामार्ग क्रमांक सहावरती समोरासमोर धडकून भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दोन्ही बस समोरासमोर भिडल्याने अक्षरशा चिरडल्या गेल्या. या भीषण अपघातत सात प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन्ही ट्रॅव्हल्समधील ते २५ ते ३० प्रवासी जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अशोक रत्नापारखी, दसरखेड एम.आय.डी.सी चे पोलीस निरीक्षक, अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच आता तातडीने मदतकार्य सुरु केले आहे.

दरम्यान, या अपघातात जखमी झालेल्यांना ॲम्बुलन्स (Ambulance)वेळेवर उपलब्ध झाली नाही. त्यामुळे पोलीस निरीक्षक अशोक रत्नापारखी यांनी जखमींना पोलिसांच्याच वाहनाने मलकापूर उपजिल्हा रुग्णालय (Hospital) येथे जखमींना दखल केले. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना बुलढाणा येथे हलवण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तर मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. या ट्रॅव्हल्समध्ये हिंगोली जिल्ह्यातील यात्रेकरु होते. हे सर्व यात्रेकरु अमरनाथ यात्रा करून हिंगोलिच्या दिशेने जात होते. त्यावेळी परतताना हा अपघात घडला . यात्रेकरुंची रॉयल ट्रॅव्हल्सची बस हिंगोलीकडे जाताना विरुद्ध दिशेने अमरावतीहून नाशिककडे जाणाऱ्या खासगी प्रवासी बसने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. मलकापूरजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर रात्री तीन वाजता हा अपघात घडला आहे. सर्व मृत हे हिंगोली जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळालेली आहे. मृतकांमध्ये तीन महिला प्रवासी तर चार पुरुष प्रवाशांचा समावेश आहे.

हे ही वाचा:

Amitabh Bachchan यांचे ‘ते’ ट्विट चर्चेत, चाहत्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

प्रसिद्ध अभिनेत्याचे Facebook Page hack, पोस्ट करत दिली माहिती म्हणाला …

दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवीचा ‘Bholaa Shankar’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss