Buldhana Strike । बुलढाणा जिल्ह्यातील २८८०० राज्य सरकारी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर

जुनी पेन्शन (Old Pension Scheme) योजना पुन्हा सुरु करावी यासाठी राज्यातील १८ लाख कमर्चाऱ्यांनी आज पासून बेमुदत बंद पुकारला आहे. मुख्यमंत्र्यांसोबत (CM Rknath Shinde) पार पडलेल्या बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्याने कर्मचारी वर्ग संप करण्यावर ठाम आहे

Buldhana Strike । बुलढाणा जिल्ह्यातील २८८०० राज्य सरकारी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर

जुनी पेन्शन (Old Pension Scheme) योजना पुन्हा सुरु करावी यासाठी राज्यातील १८ लाख कमर्चाऱ्यांनी आज पासून बेमुदत बंद पुकारला आहे. मुख्यमंत्र्यांसोबत (CM Rknath Shinde) पार पडलेल्या बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्याने कर्मचारी वर्ग संप करण्यावर ठाम आहे. त्यामुळे राज्यभरातील लाखो कर्मचारी संपावर आहेत. याचा सगळ्यात जास्त फटका बुलढाणा (buldhana)  जिल्ह्याला बसला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी संपावरगेले असल्याने जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्यात यावी या मागणीसाठी बुलढाणा जिल्ह्यातील २८ हजार आठशे कर्मचारी एकदमच संपावर गेल्याने पूर्ण प्रशासकीय व्यवस्था ठप्प झाली आहे. त्यामुळे नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. 'नाटू नाटू' हे गाणं' आणि द एलिफंट विस्परर्स' 'ऑस्कर 2023'मध्ये विजेते ह्या संपामुळे जिल्ह्यातील जन सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली असून या संपामध्ये आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी व वैद्यकीय अधिकारी सहभागी झाले आहेत. कर्मचारी वर्ग संपावर गेल्याने बुलढाणा जिल्ह्यातील आरोग्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे .जिल्हाधिकारी कार्यालयातील साडेआठ हजार कर्मचारी आरोग्य विभागातील पाचशे कर्मचारी, जिल्हा परिषद विभागातील पंधरा हजार कर्मचारी संपावर गेले आहे तर नगरपालिकेतील साडेपाच हजार कर्मचारी या संपत सहभागी झाले आहेय. संपावर गेल्याने जोपर्यंत जुनी पेन्शन लागू होत नाही तोपर्यंत हा संप बेमुदत राहणार असल्याचं संपकरणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं आहे.

हे ही वाचा :

जुन्या पेंशन योजनेसाठी सुरू असलेल्या आंदोलनातून सरकारने तातडीने मार्ग काढावा, अजित पवार जनतेच्या मनातील सरकार असतं तर… संजय राऊतांचा हल्लाबोल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version