spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

शेतकरी कुटुंबांना ३ हजार कोटींचा फायदा- PM Narendra Modi

यवतमाळ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध कामांचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला सशक्तीकरण अभियान, सिंचन, रेल्वे तसेच रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ केला. पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत १ हजार ६८३ कोटी निधीतून विदर्भ आणि मराठवाड्यातील ६ प्रकल्पांचे लोकार्पण झाले. या प्रकल्पातून २.४१ लाख हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. बळीराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत १ हजार १८० कोटी निधीतून विदर्भ आणि मराठवाड्यातील ४५ सिंचन प्रकल्पांमुळे ५१ हजार हेक्टरची सिंचन क्षमता निर्माण झाली आहे.

प्रवासाच्या वेळेत एक तासाची कपात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध रस्ते, महत्वाकांक्षी प्रकल्पांचा शुभारंभ व लाभ वितरण झाले. त्यात वरोरा-वणी महामार्गावरील १८ किमी चौपदरीकरणामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस, वणी, तडाळी, पडोळी यांसारख्या विविध औद्योगिक क्षेत्रांना फायदा मिळेल. सुमारे ३७८ कोटी निधीतून सलाईखुर्द-तिरोरा महामार्गावरील ४२ किमी काँक्रिटीकरणामुळे गोंदिया ते नागपूर प्रवासाच्या वेळेत एक तासाची कपात होऊन नागझिरा अभयारण्याच्या पर्यटनाला चालना मिळेल. सुमारे २९१ कोटी  निधीतून साकोली- भंडारा जिल्हा सीमेपर्यंतच्या ५५.८० किमी दुपदरी रस्त्याचेही लोकार्पण झाले.

यवतमाळ जिल्ह्यांतील दळणवळण गतिशील

अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गावर ६४५ कोटी निधीतून न्यू आष्टी-अमळनेर टप्प्याचे व अंमळनेर-न्यू आष्टी स्टेशनपर्यंत विस्तारित रेल्वे सेवेचा शुभारंभ झाला. त्याचा लाभ बीड जिल्ह्यातील नागरिक व कामगार वर्गाला मिळेल. सुमारे ६७५ कोटी निधीतून वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गावरील वर्धा-कळंब या टप्प्याचे लोकार्पण व नवीन रेल्वे गाडीचा शुभारंभ झाला. त्यामुळे वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांतील दळणवळण गतिशील होईल. यवतमाळ जिल्ह्यात प्रथमच ब्रॉडगेज रेल्वे सेवा सुरू झाली आहे.

कुटुंबांना ३  हजार ८०० कोटी रुपयांचा लाभ

पीएम किसान सन्मान निधीच्या १६ व्या हप्त्याचे थेट बँक खात्यात वितरित झाले. देशातील ९  कोटी शेतकरी कुटुंबांना एकूण २१ हजार कोटी रुपयांचे, तसेच राज्यातील सुमारे ८८ लाख शेतकरी कुटुंबांना १ हजार ९६९ कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले. आधार लिंक बँक खात्यात लाभांचे डिजिटल हस्तांतरण करण्यात आले. नमो शेतकरी महासन्मान निधीअंतर्गत दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याचे वितरण करण्यात आले. त्यात राज्यातील सुमारे ८८  लाख शेतकरी कुटुंबांना ३  हजार ८०० कोटी रुपयांचा लाभ मिळाला.

१ कोटी आयुष्मान कार्डचे वितरण

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत ५.५० लाख महिला बचत गटांना ८२५  कोटी फिरत्या निधीचे वितरण करण्यात आले. स्वयंसहाय्यता समूहांना अतिरिक्त खेळते भांडवल देण्यासाठी ९१३ कोटी रुपयांची विशेष तरतूद करण्यात आली. आयुष्मान भारत अंतर्गत महाराष्ट्रात १ कोटी आयुष्मान कार्डचे वितरण होत असून, योजनेच्या ३ लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात कार्डचे वितरण करण्यात आले. इतर मागास प्रवर्गासाठी मोदी आवास योजनेचा शुभारंभही झाला. त्यात येत्या ३ वर्षात १० लाख घरे बांधण्यात येणार असून, २.५  लाख लाभार्थ्यांना ३७५ कोटींच्या पहिल्या हप्त्याचे ऑनलाईन वितरण करण्यात आले.

Latest Posts

Don't Miss