spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

सोलापुरात एसटी अपघातात ३५ हून अधिक जखमी, मुख्यमंत्र्यांकडून ५० हजारांची मदत जाहीर

सोलापूर - गाणगापूर एसटीमध्ये एकूण ७० प्रवासी प्रवास करत होते. मिळालेल्या माहितीनुसार ३५ जण या अपघातात जखमी झालेले असून चार ते पाच प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे.

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट – मैंदर्गी मार्गावर गाणगापूर येथील एसटी बसला भीषण अपघात झाला. या अपघातात एकूण ३५ जण जखमी असून सर्वांना अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अक्कलकोट येथील रुग्णालयात एकच डॉक्टर असल्यामुळे खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांचे देखील तेथे पाचरण करण्यात आलेले आहे. ही घटना सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली असून बस अपघात होण्याचे नेमके कारण अद्यापही स्पष्ट करण्यात आलेले नाही.

सदर अपघाताची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे.अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीने शासकीय खर्चाने उपचार सुरू करण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे अपघातात गंभीर जखम झालेल्यांना  किंवा मोठा अस्थिभंग झालेल्या प्रवाशांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पन्नास हजार रुपये अधिकची आर्थिक मदत करण्यात यावी, असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

सोलापूर – गाणगापूर एसटीमध्ये एकूण ७० प्रवासी प्रवास करत होते. मिळालेल्या माहितीनुसार ३५ जण या अपघातात जखमी झालेले असून चार ते पाच प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली असून तातडीने जखमींना जवळपासच्या रुग्णालयामध्ये हलवण्याचे आदेश दिले आहेत.

सध्या पावसाळ्याच्या काळात बसचे अपघात हे सातत्याने वाढत आहे. तसेच प्रत्येक बस अपघातामागील कारणं जरी वेगळी असली, तरी घडणारे अपघात हे फार गंभीर आहेत. त्यामुळे आता येत्या काळात असे अपघात टाळता यावेत म्हणून राज्यसरकार नक्की काय पाऊलं उचलणार आहे हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल.

 

 

Latest Posts

Don't Miss