जालन्यात ३९० कोटींचे बघाड ! तब्ब्ल १३ तास पैशांची मोजणी

राज्यातील जालना येथील सर्वाधिक लोखंडी गज उत्पादन करणाऱ्या जालना येथील स्टील कारखानदार, घर, कार्यालय येथे प्राप्तिकर भिभागाने छापेमारी केली आहे.

जालन्यात ३९० कोटींचे बघाड ! तब्ब्ल १३ तास पैशांची मोजणी

जालन्यात ३९० कोटींचे बघाड ! तब्ब्ल १३ तास पैशांची मोजणी

मुंबई :- राज्यातील जालना येथील सर्वाधिक लोखंडी गज उत्पादन करणाऱ्या जालना येथील स्टील कारखानदार, घर, कार्यालय येथे प्राप्तिकर भिभागाने छापेमारी केली आहे. प्राप्तिकर विभागाने केलेल्या या छाप्यांमध्ये कोणताही हिशोब नसलेली सुमारे ३९० कोटींची मालमत्ता हि उघडकीस आली आहे. हि समोर आलेली सर्व रोकर मोजण्यास पथकाला तब्ब्ल १३ तास लागले आहेत. सकाळी ११ वाजता सुरू झालेली माेजणी रात्री १ वाजता पूर्ण झाली. १ ते ८ ऑगस्टपर्यंत चाललेल्या या कारवाईसाठी नाशिक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह राज्यभरातील २६० अधिकाऱ्यांसह कर्मचारी १२० हून अधिक वाहनांच्या ताफ्याद्वारे जालन्यात पोहोचले होते. जालन्यात मिळालेली ही राेकड स्थानिक स्टेट बँकेत नेऊन माेजण्यात आली.

यामध्ये सुमारे ३९० कोटींची बेहिशोबी मालमत्ता हि समोर आली. या समोर आलेल्या मालमत्तेमध्ये ५८ कोटींची रोख रोकड, ३२ किलो डोळ्याचे दागिने, हिरे, मोती असा १६ कोटींचा ऐवज सुमारे ३०० कोटींच्या बेहिशेबी मालमत्तेच्या कागदपत्रांसह महत्त्वाचा दस्तऐवज जप्त करण्यात आला. यासर्व प्रकरणी ज्यांच्यावर कारवाई झाली त्यात औरंगाबादमधील एका प्रख्यात लँड डेव्हलपर आणि व्यापाऱ्याचाही समावेश आहे.

जालन्याच्या या चारही स्टील व्यावसायिकांपैकी तिघांकडे रोख रकमेसह सोन्याचे दागिने, बिस्किटे, नाणी, हिरे मिळाले. सोन्याच्या ३२ किलो दागिन्यांची बाजारभावानुसार किंमत १६ कोटी रुपये आहे. आयकर विभागाने या व्यापाऱ्यांची घरे, कार्यालयांतून वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या जमिनी, शेती, बंगले यांसह बँकांतील ठेवी, इतर व्यवहारांशी संबंधित कागदपत्रे जप्त केली. आयकर विभागाच्या औरंगाबादच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार, जालना येथील चार बड्या स्टील कारखानदारांनी कोट्यवधी रुपयांचे जादा उत्पन्न व्यवसायातून मिळवत ते पूर्णपणे रेकॉर्डवर न आणता रोखीत व्यवहार केले आहेत. याचा प्राप्तिकर बुडवल्याचा संशय होता. नाशिकच्या पथकाने स्थानिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने जालन्यात १ ऑगस्टला दुपारच्या सुमारास वेगवेगळ्या वाहनांतून जाऊन स्टील कारखानदार आणि व्यावसायिकांच्या कार्यालयांवर तसेच निवासस्थानी छापे टाकले. एकाच वेळी वेगवेगळ्या पाच पथकांनी ही कारवाई केली. आयकर विभागाला या कारवाईत सुरुवातीला काहीच हाती लागले नाही. त्यामुळे या पथकांनी त्यांच्या शहराबाहेरील आठ ते दहा किलोमीटरवरील फार्महाऊसकडे मोर्चा वळवला. तेथे कपाटांखाली, बिछान्यांमध्ये तसेच अडगळीतील काही पिशव्यांत रोकड सापडली. सर्वत्र नोटांची बंडलेच बंडले आढळली. आणखी एका व्यावसायिकाच्या घरीही अशीच रक्कम सापडली.

एकूण सापडलेली मालमत्ता – 

हे ही वाचा :- 

ठाकरे गटाचे शिफारस पत्र विधानसभा अध्यक्षांनी फेटाळले तर शिंदेगटातील नेत्यांची नियुक्ती

 

Exit mobile version