उल्हासनगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून ४ जणांचा मृत्यू

उल्हासनगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून ४ जणांचा मृत्यू

उल्हासनगर मधून मोठी दुर्घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. उल्हासनगरमधील कॅम्प क्रमांक पाच परिसरात ओटी चौकात ( Building Slab Collapse In Ulhasnagar ) असलेले मानस टॉवर या इमारती पाचव्या मजल्याचा स्लॅब हा चौथ्या, तिसरा असा करत थेट जमीन दोस्त झाला. या घटनेत आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी आहे. आज दुपारच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे.

उल्हासनगरात पुन्हा एकदा इमारतीचा स्लॅब कोसळण्याची घटना घडली आहे. ढिगाऱ्याखाली दबून चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी झाले आहेत. उल्हासनगर (Ulhasnagar ) महापालिकेकडून ढिगारा उपसण्याचं काम सुरू आहे. सागर ओचानी (१९ वय), रेणू धोलांदास धनवानी (५५ वय), धोलानदास धनावनी (५८ वय) आणि प्रिया धनवानी (२४ वय) असे मृत झालेल्यांची नावे आहेत. मयत झालेल्यामध्ये एकाच परिवारातील तीन जणांचा समावेश आहे. उल्हासनगरच्या कॅम्प पाचमधील ओटी सेक्शन भागात मानस टॉवर नावाची पाच मजली इमारत आहे. या इमारतीच्या तिसऱ्या मजल्याचा स्लॅब आज दुपारच्या सुमारास कोसळला आणि थेट तळमजल्यावर असलेल्या चक्कीवर येऊन कोसळला. या दुर्घटनेत इमारतीमधील काहीजण जण ढिगाऱ्याखाली दाबले गेले. यापैकी सहा जणांना बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आलं असता चार जणांचा मृत्यू झाला आहे.

उल्हासनगर महापालिकेने २०२१ आणि २०२२ या दोन्ही वर्षी सदर इमारत धोकादायक असून तिचे सर्वेक्षण करण्याचे पत्र दिले होते. मात्र तरी देखील रहिवासी या इमारतीत राहत होते. या घटनेने संपुर्ण उल्हासनगर शहरांत शोककळा पसरली आहे. त्यामुळे उल्हासनगर महापालिकेने एनडीआरएफच्या टीमला सुद्धा पाचरण केल्याची माहिती उल्हासनगर महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी दिली आहे.

हे ही वाचा:

आज एकाचवेळी मुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री बोलणार

ICC ने क्रिकेटचे नवीन नियम जाहीर, नवीन नियम या दिवसा पासून लागू होणार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version