spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

यवतमाळमध्ये पुराच्या पाण्यात अडकले तब्ब्ल ४५ जण, हेलिकॉप्टरच्या साहाय्याने बाहेर काढणार, देवेंद्र फडणवीस यांची माहिती

जिल्ह्यात मध्यरात्रीपासून विजांचा कडकडाटांसह पावसाचे रौद्ररुप पाहायला मिळाले. आतापर्यंत जिल्ह्यात अगदी कमी कालावधीमध्ये विक्रमी पाऊस बरसला आहे.

गेले काही दिवस देशातील विविध राज्यात मुसळधार पाऊस कोसळताना दिसत आहे. अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. रस्त्यांना नद्यांचं स्वरुप प्राप्त झालं असून अनेक ठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे, दरम्यान यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यात पावसाची (Rain) जोरदार बॅटींग सुरु आहे. तर यवतमाळ जिल्ह्यात अनेक गावांना पुराने वेढा घातला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील आनंदनगर तांडा येथे पुराच्या पाण्यामुळे सुमारे ४५ लोक अडकले आहेत. या अडकेलेल्या लोकांना हेलिकॉप्टरच्या साहाय्याने बाहेर काढण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी ट्वीट करत दिली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत यवतमाळमधील परिस्थिती संदर्भात माहिती दिली आहे. तर भारतीय हवाई दलाचे २ हेलिकॉप्टर्स नागपुरात पोहचणार आहेत. त्यानंतर अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी लगेच महागावसाठी रवाना होणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. तर आम्ही सातत्याने स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात असल्याचं देखील फडणवीसांनी म्हटलं आहे. तसेच प्रशासन यवतमाळ मधील परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याची माहिती देखील देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. यवतमाळचे आमदार मदनभाऊ येरावार (Madanbhau Yerawar) यांच्या देखील ते संपर्कात असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

जिल्ह्यात मध्यरात्रीपासून विजांचा कडकडाटांसह पावसाचे रौद्ररुप पाहायला मिळाले. आतापर्यंत जिल्ह्यात अगदी कमी कालावधीमध्ये विक्रमी पाऊस बरसला आहे. यामध्ये यवतमाळमध्ये २३६ मिलिमीटर, महागाव २३१ मिमी, आर्णी १६४ मिमी, घाटंजी १४२ मिमी तर कळंब, दारव्हा दिग्रसमध्ये मिमी आणि इतर तालुक्यांमध्ये ९० मिमीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर एसडीआरएफची दोन पथकं बचावकार्यसाठी तयार करण्यात आली आहेत.

हे ही वाचा:

बांग्लादेशचा १२० धावांवर डब्बा गूल, भारताचा दणदणीत विजय

राज्यात मुसळधार पावसामुळे प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss