Central Railwayचा ६ दिवसांचा मेगाब्लॉक कधी व कुठे असणार? जाणून घ्या सविस्तर …

मध्य रेल्वे सहा दिवसांचा मेगाब्लॉक घेणार आहे. यामुळे पुण्याकडे जाणाऱ्या १९ गाड्या रद्द तर २२ लांब पल्ल्याच्या गाड्यांचे मार्ग बदलले जाणार आहेत. यामुळे मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या प्रवासाचे हाल होणार आहेत.

Central Railwayचा ६ दिवसांचा मेगाब्लॉक कधी व कुठे असणार? जाणून घ्या सविस्तर …

सध्या मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वेचे तीन तेरा वाजल्याचे दिसून येत आहे. अशातच आता मध्य रेल्वे सहा दिवसांचा मेगाब्लॉक घेणार आहे. यामुळे पुण्याकडे जाणाऱ्या १९ गाड्या रद्द तर २२ लांब पल्ल्याच्या गाड्यांचे मार्ग बदलले जाणार आहेत. यामुळे मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या प्रवासाचे हाल होणार आहेत.

रेल्वे प्रशासनाकडून एक महत्वाची अपडेट जाहीर करण्यात अली आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागात सहा दिवसांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. दौंड रेल्वे स्थानकातील विविध कामांसाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे. २७ जुलै ते १ ऑगस्ट दरम्यान हा ब्लॉक असणार आहे. या काळात अनेक रेल्वे रद्द करण्यात येणार आहेत तर काही रेल्वेगाड्यांचे मार्ग बदलले जाणार आहेत. यादरम्यान सोलापूर पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस ३ दिवसांसाठी रद्द करण्यात येणार आहे. ही ट्रेन ३ दिवस रद्द केल्याने प्रवाशांची तारांबळ उडणार आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनस ते विशाखापट्टणम एक्स्प्रेस ही गाडी २९ जुलै ते १ ऑगस्ट दरम्यान पुणे-मिरज-कुर्डुवाडी मार्गे रवाना होईल. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-बंगळुरू एक्स्प्रेस ही गाडी ब्लॉक काळात पुणे-मिरज-कुर्डुवाडी मार्गे रवाना केली जाईल. त्यासोबतच बंगळुरू-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस २७ ते ३१ जुलैपर्यंत कुर्डुवाडी-मिरज-पुणे मार्गे वळवली जाईल. तसेच नागरकोयल-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस ही गाडी २८ जुलै रोजी गुंतकल-बल्लारी-हुबळी-मिरज-पुणे मार्गे रवाना तर चेन्नई-एकतानगर एक्स्प्रेस ही गाडी २८ जुलै रोजी गुंतकल-बल्लारी-हुबळी -मिरज-पुणे मार्गे रवाना धावणार आहे. मध्य रेल्वेकडून घेण्यात आलेल्या या सहा दिवसांचा मेगाब्लॉक फटका लांब पल्ल्याच्या गाडयांना बसणार आहे. तसेच यामुळे प्रवाशांचे मेगाहाल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हे ही वाचा:

Pune Monsoon Updates: दुर्घटना टाळण्यासाठी स्वत:सह कुटुंबाची काळजी घ्या, Ajit Pawar यांचे नागरिकांना आवाहन

पूर परिस्थितीत प्रशासन मदतीसाठी फिल्डवर, बचाव कार्य सुरू CM Shinde यांची माहिती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version