विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूकीसाठी राष्ट्रवादीचे ७ मतदार गैरहजर

विधान परिषदेच्या निवडणुकीच्या मतदानासाठी सकाळपासून सुरूवात झाली आहे. प्रत्येक पक्षाने आपल्या आमदारांची काळजी घेतली आहे.

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूकीसाठी राष्ट्रवादीचे ७ मतदार गैरहजर

विधान परिषदेच्या निवडणुकीच्या मतदानासाठी सकाळपासून सुरूवात झाली आहे. प्रत्येक पक्षाने आपल्या आमदारांची काळजी घेतली आहे. सकाळी नऊ वाजता मतदानाला सुरूवात झाली आहे. मतदान चारवाजेपर्यंत होणार आहे. सायंकाळी पाचनंतर विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

राज्य विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल नार्वेकर आणि शिवसेनेचे राजन साळवी यांच्यात ‘सामना’ रंगला. या लढतीत भाजपाच्या राहुल नार्वेकर यांनी १६४ मतांनी एकतर्फी  सरशी मिळवली. मात्र या प्रतिष्ठेच्या मुकाबल्यासाठी १३ सदस्य मतदानात सहभागी होऊ शकले नाही. यात राष्ट्रवादीच्या सर्वाधिक (७) सदस्यांचा समावेश आहे.भाजपचे लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक हे रूग्णालयात उपचारार्थ दाखल असल्याने मतदानाला आले नाहीत तर सेनेच्या रमेश लटके यांचे निधन झाले आहे. मतदानात सहभागी न झालेले १३ सदस्य पुढील प्रमाणे आहेत.

नवाब मलिक,अनिल देशमुख, निलेश लंके, दिलीप मोहिते, दत्तात्रय भारणे, बबन शिंदे आणि अण्णा बनसोडे हे सर्व राष्ट्रवादी पक्षातले आहेत. तर  लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक ( दोन्ही भाजप) प्रणिती शिंदे (कॅांग्रेस) मुफ्ती इस्माईल (एमआयएम) आणि रमेश लटके (शिवसेना) (मृत्यू).  नरहरी झिरवळ हे उपाध्यक्ष पदी असल्याने मतदान करू शकत नाहीत.

Exit mobile version