spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

राज्यात शाळकरी मुलांनी ‘तिरंगा रॅली’ व विविध स्पर्धांमध्ये सहभागी घेत 75 वा स्वातंत्र्यदिन केला साजरा

संपूर्ण राज्यभरात आझादी अमृत महोत्सव मोहिमेचा एक भाग म्हणून स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष साजरे करण्यात येत आहे. यात शाळेतील विद्यार्थी उत्साहाने सहभागी होत आहेत. विद्यालयाकाढून अनेक स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. असेच राज्यातील पालघर जिल्हातील तलासरी येथे एका अधिकाऱ्यांनी शनिवारी सायकल शर्यतीचे आयोजन केले होते. या शर्यतीत ५० हून अधिक सायकलस्वार सहभागी झाले होते. आणि त्यातील अनेकांच्या सायकलवर ध्वज लावला होता. सायकल रॅलीनंतर अंजली रामजी खांजोडे इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुलांनी देशभक्ती आणि धर्मनिरपेक्षतेचा संदेश देणारी छोट नाट्य रुपात सादरीकरण केले.

तलासरी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक सतीश शिवरकर म्हणाले, “राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी, ज्यामध्ये तलासरी पोलिस आणि महसूल विभागाचे अधिकारी आणि डहाणूचे स्थानिक आमदार विनोद निकोले आणि पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा यांचा समावेश होता, त्यांनी पालघर येथे कार्यक्रम आयोजित केले आणि त्यात भाग घेतला.” अशी माहिती समोर येत आहे.

“शाळेतील सुमारे 475 मुले त्यांच्या शाळेपासून ते गोराई पोलिस ठाण्यापर्यंत रस्त्यावर पोलिस आणि शिक्षकांसह चालत होते. पोलीस स्टेशनमध्ये आम्ही सर्व राष्ट्रगीताला उभे राहिलो. मुलांनी देशभक्तीच्या घोषणाही दिल्या. दुसरी रॅली स्थानिक रहिवाशांसाठी ठेवण्यात आली होती. गोराईतील सुमारे 250 ते 300 लोक रॅलीत सहभागी झाले होते,” गोराई पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक मंदाकिनी नरोटे यांनी दिली.

हेही वाचा : 

बंजारा समाजाकडून संजय राठोड यांचे समर्थन

Latest Posts

Don't Miss