१७ वर्षीय मूकबधिर मुलीवर लैंगिक अत्याचार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

१७ वर्षीय मूकबधिर मुलीवर लैंगिक अत्याचार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील एका गावात ही घटना घडली आहे . कन्नड तालुक्यातील एका गावात सतरा वर्षीय मूकबधिर मुलीवर गावातील व्यक्तीकडूनच लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. मुलीच्या घरात कुणीच नसल्याचा फायदा घेत आरोपीने मुलीवर बळजबरीने अत्याचार केला. याप्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून कन्नड शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून आरोपीला त्वरित अटक करण्यात आले . आरोपीला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. मोरू रामू राठोड असे आरोपीचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत मुलीचे आई-वडील कामानिमित्त घराबाहेर गेले होते. तर पिडीत मुलगी मूकबधिर असल्याने तिला बोलता येत नाही, सोबतच तिची बुद्धी देखील कमी आहे. २५ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास मुलीचे आई-वडील घरात नसल्याचा फायदा घेत आरोपी मोरू राठोड पिडीत मुलीच्या घरात घुसला. घरत कोणीच नसल्याने आणि मुलीला बोलता येत नसल्याचा फायदा घेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तो तेथून फरार झाला.

पिडीत मुलीचे आई-वडील मोलमजुरी करून घर चालवतात . २५ ऑक्टोबरच्या संध्याकाळी पीडितेच्या आई वडील घरी परतले असता आई वडिलांना बघून मुलीने घडलेला प्रकार सांगण्याच्या प्रयत्न केला , त्यावर आईने अधिक चौकशी केली तेव्हा आपल्या मुलीवर अत्याचार करण्यात आल्याचे त्यांना लक्षात आले. त्यामुळे मुलीच्या आईने कन्नड शहर पोलीस ठाणे गाठून आरोपी विरोधात फिर्याद दिली. त्यानुसार मोरू राठोड विरोधात पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. तर आरोपीला अटक करण्यात आली असून, आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

हे ही वाचा :

झिम्बाब्वेकडून पाकिस्तानचा अवघ्या एका धावेनं पराभव

हे सरकार घटना बाह्य आहे; आम्हाला फसवलं शेतकऱ्यांना नका फसवू- आदित्य ठाकरे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version