समर्थ रामदासांच्या जन्मगावातील राम मंदिरातून ४५० वर्षांपूर्वीची मूर्ती चोरीला

समर्थ रामदासांच्या (Samarth Ramdas) जन्मगावी 'जांब समर्थ' येथील राम मंदिरातून (Ram Mandir) ऐतिहासिक मूर्ती चोरीला गेली आहेत.

समर्थ रामदासांच्या जन्मगावातील राम मंदिरातून ४५० वर्षांपूर्वीची मूर्ती चोरीला

समर्थ रामदासांच्या (Samarth Ramdas) जन्मगावी ‘जांब समर्थ’ येथील राम मंदिरातून (Ram Mandir) ऐतिहासिक मूर्ती चोरीला गेली आहेत. जालना येथे समर्थ रामदास यांच्या जन्मगावातील राममंदीरातील ऐतिहासीक मूर्ती आज पहाटे चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. जवळपास ४५० वर्ष जुन्या असलेल्या या पंचधातूच्या मूर्ती चोरीला गेल्याने परिसरात एकच खळबळ माजली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. समर्थ रामदासांनी स्थापित केलेली राम-लक्ष्मण-सीतेची मूर्ती तसेच ऐतिहासिक पंचायतन देखील चोरीला गेले आहे.

अज्ञात चोरट्यांकडून मंदिरातील ऐतिहासिक दुर्मिळ पंचधातूंच्या मुर्त्या चोरी करण्यात आल्या आहेत. समर्थ रामदासांनी स्थापित केलेली राम लक्ष्मण सीतेची मूर्ती देखील चोरीला गेली आहे. तसेच ऐतिहासिक पंचायतन (राम लक्ष्मण सीता, भरत, शत्रूघ्न) देखील चोरीला गेले आहे. जांब समर्थ हे समर्थ रामदास स्वामींचे जन्मगाव आहे. हे ठिकाण जालना जिल्‍हयातील घनसावंगी तालुक्‍यामध्‍ये आहे. हे राम मंदिर रामदास स्‍वामी यांच्‍या घरामध्‍ये स्‍थित आहे. समर्थ मंदिर हे संत रामदास स्‍वामी यांच्‍या आठवणीमध्‍ये बनविण्‍यात आले आहे. एका संस्‍थेमार्फत या मंदिराचे व्‍यवस्‍थापन पाहिले जाते.

समर्थ झोळीत ठेवत असलेली तसेच दंडात बांधत असलेल्या मारोतीच्या मुर्त्या देखील चोरीला गेल्या आहेत. घटनेची माहिती कळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी रात्री ३ च्या सुमारास चोरी झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. पाळत ठेऊन मंदिरातील चावी घेऊन चोरी केल्याचं समोर आलं आहे. दरम्यान या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची पोलिस कसून चौकशी करत आहेत.

जांब समर्थ हे समर्थ रामदास स्वामींचे जन्मगाव आहे. हे ठिकाण जालना जिल्‍हयातील घनसावंगी तालुक्‍यामध्‍ये आहे. हे राम मंदिर रामदास स्‍वामी यांच्‍या घरामध्‍ये स्‍थित आहे. समर्थ मंदिर हे संत रामदास स्‍वामी यांच्‍या आठवणीमध्‍ये बनविण्‍यात आले आहे. एका संस्‍थेमार्फत या मंदिराचे व्‍यवस्‍थापन पाहिले जाते.

 

हे ही वाचा :-

विनायक मेटेंच्या अपघातावर अधिवेशनात प्रश्न उपस्थित, फडणवीसांनी नेत्यांना दिला सल्ला

UPI व्यवहारांवर सरकार शुल्क आकारणार का ? केंद्रीय अर्थमंत्र्याचे स्पष्टीकरण

 

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.
Exit mobile version