शंभूराज देसाई यांच्या गाडीवर बाटली उडाल्याने सगळीकडे एकच खळबळ

राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई(Shamburaj Desai) त्यांच्या गाडीवर काल रात्री अचानक पोवई नाका येथे एक बाटली पडली.

शंभूराज देसाई यांच्या गाडीवर बाटली उडाल्याने सगळीकडे एकच खळबळ

राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई(Shamburaj Desai) त्यांच्या गाडीवर काल रात्री पोवई नाका येथे अचानक एक बाटली पडली. त्यामुळे देसाई यांच्या गाडीवर हल्ला झाला त्यामुळे सगळीकडे तणाव निर्माण झाला आहे. बाटली पडल्यानंतर काही वेळासाठी पोलिसांनी गाड्यांचा ताफा थांबवून ठेवला. मात्र पोलिसांनी तपास केल्यानंतर ही बाटली दारूच्या नशेत एका व्यक्तीने फेकली होती. त्यानंतर पोलिसांनी दारुड्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

शंभूराज देसाई यांचा ताफा सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातून त्यांचा ताफा कोयना दौलत या त्यांच्या राहत्या घरी निघाला होता. त्यावेळी पोवई नाका येथे त्यांच्या गाडीवर अचानक एक बाटली पडली. बाटली पडल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही पाहिल्यानंतर एका व्यक्तीने दारूच्या नशेत पाण्याची बाटली फेकल्याचे समोर आले आहे. नम्या यंत्र्या भोसले(वय ४५) असे दारुड्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणात पोलीस कर्मचारी सुशांत कदम यांनी सातारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोवई नाका येथे नम्या भोसलेचे एका शेंगदाणे-फुटाणे विकणाऱ्या व्यक्तीसोबत भांडण झाले. नम्या भोसले हा शेंगदाणे – फुटाणे विकत घेऊन पैसे देत नव्हता त्यावरून दोघांमध्ये हमरातुमरी झाली. त्यावेळी दारुड्याने हातात असलेली बाटली हवेत उडवली. हवेत उडवल्यानंतर ही बाटली शंभूराज देसाई यांच्या गाडीवर पडली. मंत्र्याच्या गाडीवर बाटली पडल्यामुळे वाहनांचा ताफा थांबवण्यात आला. पोलिसांच्या ही घटना लक्षात आल्यानंतर त्यांनी पालकमंत्र्यांचे वाहन पुढे पाठवले आणि एक पोलीस व्हॅन तिथेच थांबवून ठेवली.

पोलिसांनी नम्या यंत्र्या भोसले याला ताब्यात घेतले आहे. पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत. तसेच आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आता सातारा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करायला सुरुवात केली आहे. या प्रकरणात घातपात करण्याचा प्रयत्न होता का? याचाही पोलीस तपास करणार आहेत.

हे ही वाचा:

आरक्षणाचा खरा फायदा कुणाला? समाजाला की दोन्हीकडच्या नेत्यांना? |MANOJ JARANGE PATIL| CHHAGAN BHUJBAL

ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का न लागू देता आरक्षण देणार | Devendra Fadnavis | Manoj Jarange Patil

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version