पुण्यात महिलांनी भरलेल्या बसला आग; खाजगी बसच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

पुण्यात महिलांनी भरलेल्या बसला आग; खाजगी बसच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

सध्या बसला आग लागण्याच्या दुर्घटना महाराष्ट्रामधे वाढत आहेत. नाशिकमधील बस दुर्घटनेची घटना ताजी असतानाच पुण्यातून अशीच आणखी एक घटना समोर आली आहे. पुणे जिल्ह्यात प्रवाशांनी भरलेली एक खासगी बस पेटली. या बसमधून २७ प्रवासी प्रवास करत होते. आगीमध्ये ही बस पूर्णपणे जळून खाक झाली असून सुदैवाने या घटनेमध्ये कोणताही जीवितहानी झाली नाही. मात्र भरस्त्यातच या बसने पेट घेतल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. एम एच ०५ डिके ९६९९ क्रमांकांची ही बस होती.

घोडेगाव जवळ पिंपळगाव घोडे गावच्या हद्दीत भिवंडी येथून श्री क्षेत्र भीमाशंकरकडे निघालेल्या महिलांच्या बसला आग लागून संपूर्ण बस जळून खाक झाली. भिवंडी पाये गावातील २३ महिला ३ पुरुष असे २६ भाविक आणि चालक बसमध्ये होते. आज सकाळी साडेसहाच्या सुमारास घोडेगावच्या पुढे गाडी आली असता बाजूने जाणाऱ्या एसटी बसच्या ड्रायव्हरने गाडीतून धूर निघत असल्याचे गाडी चालकाला सांगितले. चालकाने गाडी बाजूला लावली असता गाडीने खालून पेट घेतल्याचे दिसून आले त्यानंतर सर्व महिला गाडीतून तातडीने उतरवल्या आणि काही क्षणात संपूर्ण बस जळू लागली. हळूहळू संपूर्ण बस जळून खाक झाली.

दोन दिवसांपूर्वीच नाशिकच्या भीषण आगीत १२ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. शिवाय अनेक प्रवाशी जखमी देखील झाले होते. ती घटना ताजी असताना पुन्हा एकदा खासगी बसने पेट घेतला आहे. या दुर्घटनेत मात्र चालकांच्या प्रसंगावधानामुळे २७ प्रवाशांचा जीव वाचला आहे आणि प्रवासी सुखरुप आहेत.

मागील काही दिवसात खासगी बसच्या आगीच्या घटनेत वाढ झाल्याचं चित्र आहे. अनेक नागरीक सोयीसाठी खासजी बसने प्रवास करतात. जास्तीचे भाडे देऊन प्रवास सुखकर होण्याकडे नागरिकांचा कल असतो. मात्र याच बसच्या दुर्घटनेत सध्या वाढ झाली आहे. खासगी बसचं जास्तीचं भाडं देऊनही प्रवास प्रवाशांच्या जीवावर बेतत असल्याचं चित्र आहे. खासगी बस मालकांचं बसच्या मेन्टेनन्सकडे दुर्लक्ष करत असल्याने अशा प्रकारचे अपघात घडत असल्याचं वारंवार बोललं जात आहे. त्यामुळे खाजगी बसच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

हे ही वाचा:

ऋतुजा लटकेंच्या अडचणीत वाढ; राजीनामा स्वीकारण्यास १५ दिवसांपेक्षा अधिक वेळ लागण्याची शक्यता

Shivsena Uddhav Balasaheb thackeray : ‘कोणत्याही दबावाला ऋतुजा लटके बळी पडणार नाही’ ; अनिल परब

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version