एका ट्विट मुळे मुबईतील तरुणावर गुन्हा दाखल

आपण असगळेच सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतो को त्याचा वापर आकस करेल आणि त्याचे परिणाम काय होतील हे सांगता येणं अवघड आहे.

एका ट्विट मुळे मुबईतील तरुणावर गुन्हा दाखल

आपण असगळेच सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतो को त्याचा वापर आकस करेल आणि त्याचे परिणाम काय होतील हे सांगता येणं अवघड आहे. असाच प्रकार मुंबईतील एका तरुण सोबत घडाला मुंबईत राहणाऱ्या सार्थक कापडी नावाच्या मुलाने १९ फेब्रुवारीला एक टीवीड केला ज्यात त्याने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील ह्यांच्या विरोधात भाष्य केल आहे. ह्यात त्याने अतिशय अर्वाच्च आणि घाणेरड्या शब्दात टीका केली आहे.तो ठाकरे गटाचा कार्यकर्ता असल्याची प्राथमिक माहिती आहे

 

प्रकरण उघडकीस कसे आले-
आधी भाजप नेत्यांना ह्या ट्विट बद्दल काहीही माहिती नव्हती ,नंतरची त्याचे ट्विटर अकाउंट फॉलो करणारी एका महिला भाजप कार्यकर्त्यांनी हे ट्विट पहिले आणि ते आमदार कृष्ण खोपडे ह्यांना पाठवले . त्यावर लगेच कारवाई करत आमदार कृष्ण खोपडे ह्यांनी नागपूर येतील लकडगंज पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे. ह्या सर्व प्रकरणात ठाकरे गट असण्याची शक्यता कृष्ण खोपडे ह्यांनी व्यक्त केली आहे. ते म्हणले “खालच्या स्तरावर, आक्षेपार्ह आणि बदनामीकारक मजकूर पोस्ट करण्याच आला आहे. हा व्यक्ती कोण आहे याची चौकशी केली असता तर सार्थक कपाडी हा मुंबईचा असल्याचं कळलं. त्याची उद्धव ठाकरेंसोबत उठबस असते आणि तो ठाकरे गटाचा कार्यकर्ता आहे. पोलिसांनी याची चौकशी करावी,”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्याविरोधात आक्षेपार्ह ट्वीट करणाऱ्या मुलाच्या विरोधात आयपीसीच्या कलम 354, 500, 504, 505, 507 आणि आयटी ॲक्टच्या कलम 67 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस चौकशी करता आहेत कि हे हॅन्डल तो स्वतः चालवायचा कि कोणी ते हॅक केल होत.

हे ही वाचा :

The CSR Journal चा प्रतिष्ठेचा ‘लीडरशीप फॉर सोशल चेंज अवॉर्ड’ खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना बहाल..!

Maharashtra Assembly Budget Session, आजपासून विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु, नव्या राज्यपालांनी केले अभिवादन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version