चिंचपोकळीच्या चिंतामणीचे दर्शन घेण्यासाठी गेलेल्या भाविकाला कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण

चिंचपोकळीच्या चिंतामणी गणेशोत्सव मंडळाच्या (Mumbai Chinchpokli Chintamani Mandal) कार्यकर्त्यांनी भाविकाला मारहाण केल्याचा व्हिडीओ निदर्शनास आला आहे.

चिंचपोकळीच्या चिंतामणीचे दर्शन घेण्यासाठी गेलेल्या भाविकाला कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण

मुंबईतील काही प्रसिद्ध मंडळांपैकी एक मंडळ चिंचपोकळीचे चिंतामणी मंडळ. चिंचपोकळीच्या चिंतामणीचे दरवर्षी मोठया जल्लोषात स्वागत केले जाते. या गणपतीला कितीतरी वर्षांची परंपरा असल्यामुळे दरवर्षी कितीतरी भाविक मोठ्या आशेने आणि भक्तिभावाने चिंचपोकळीच्या चिंतामणीचे दर्शन घेण्यासाठीं गर्दी करतात. पण यावर्षी भाविकांची अशीच गर्दी झाली असताना एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चिंचपोकळीच्या चिंतामणी गणेशोत्सव मंडळाच्या (Mumbai Chinchpokli Chintamani Mandal) कार्यकर्त्यांनी भाविकाला मारहाण केल्याचा व्हिडीओ निदर्शनास आला आहे. भाविकांची गर्दी नियंत्रणात करत असताना बॅरिकेट्स लावण्यात येत होते, त्यावेळी काही भाविक आतमध्ये शिरले. यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी भाविकाला मारहाण केल्याची घटना घडली.

शनिवारी रात्रीचा हा व्हिडीओ आहे. शनिवार-रविवार असल्याने मोठ्या प्रमाणावर भाविक घराबाहेर पडल्याचं दिसून आलं. मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कार्यकर्ते प्रयत्न करत होते. त्या दरम्यान ही घटना घडली. या व्हिडिओमध्ये एका तरुणाला मंडळाचे पाच-सहा कार्यकर्ते मारहाण करत असल्याचं दिसून येत आहे. तसेच हा सर्व प्रकार घडत असताना या ठिकाणी जवळपास पोलीसही दिसत नसल्याचं व्हिडिओतुन स्पष्ट होतंय.

तसेच संबंधित व्हिडिओ व्हायरल झाल्यानांतर चिंचपोकळी मंडळाचे सचिव प्रणील पांचाळ प्रसारमाध्यमांना “गणेश दर्शनासाठी झालेली ही गर्दी नियंत्रणाबाहेर गेली होती. कार्यकर्त्यांनी त्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मारहाण झालेला तो मुलगा नशा करुन आला होता. तसेच त्याने महिलांची छेड काढण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळाली. त्यामुळे हा प्रकार घडला. त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त नव्हता. गर्दीच एवढी होती की त्या ठिकाणी कुणाला जाता आला नाही.”, असे स्पष्टीकरण देताना दिसून आले आहेत.

मुंबईत गणेश मंडळं ही गणेशोत्सवाचा एक महत्तवाचा भाग समजली जातात. पण अलिकडच्या काळात मंडळांना मिळालेली प्रसिद्धी आणि प्राप्त झालेल्या प्रातिष्ठेमुळे गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अरेरावी सातत्याने वाढत आहे आणि त्याचा दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांवर होताना दिसत आहे.तसेच आता घडलेल्या प्रकारामुळे भाविकांकडून मोठ्या प्रमाणावर टीका केल्या जात आहेत आणि त्याचबरोबर नाराजी देखील व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा:

दादा हा ‘शो’ नाही, पहाटेच्या फ्लॉप ‘शो’सारखा हा ‘शो’ले आहे, म्हणत श्रीकांत शिंदेंनी अजित पवारांवर केला पलटवार

सांडपाण्यावर प्रक्रिया करुन ते पिण्यायोग्य बनवण्यासाठी मुंबई महानगरपालिका करणार २५० कोटींचा खर्च

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version