Monday, September 30, 2024

Latest Posts

छत्रपती संभाजीनगर मधून ७०० वाहनांचा ताफा जाणार मनोज जरांगे यांच्या सभेला

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी जालन्यातील अंतरवली सराटी गावात उपोषण केले होते. सरकारला ४० दिवसाचा अल्टिमेट दिल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी जालन्यातील अंतरवली सराटी गावात उपोषण केले होते. सरकारला ४० दिवसाचा अल्टिमेट दिल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले. त्यांच्या या अल्टिमेटला १४ ऑक्टोबरला ३० दिवस पूर्ण होणार आहेत. या निमित्त सरकारला आठवण करून देण्यासाठी मनोज जरांगे सराटी गावात सभा घेणार आहेत. त्यांच्या या सभेला मराठा बांधव मोठ्या संख्यने उपस्थित राहणार आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून (Chhatrapati Sambhajinagar) देखील मोठ्या प्रमाणात मराठा समाज बांधव जालना येथील सभेला जाणार आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून ७०० वाहनांचा ताफा घेऊन या सभेला जाणार असल्याचा निर्णय मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.

जालन्यातील अंतरवली सरती गावात मनोज जरांगे हे १४ ऑक्टोबरला सभा घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहरात मराठा समाजाची बैठक शनिवारी होणार आहे. १४ ऑक्टोबरला घेण्यात येणाऱ्या सभेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तसेच या सभेला ग्रामीण व शहरी भागातून मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी सातशे वाहनांचे नियोजन करण्यात आले आहे. सभेच्या वेळी कोणतीही गैरसोय होऊ नये याची काळजी घेण्यात येणार आहे. काही मराठा बांधव अंतरवली गावात वैयक्तिक वाहनांनी येणार असून मराठा आरक्षणासाठी सर्वांनी सहकार्य करावे असा या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र घ्यावे अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी उपोषण केले होते. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपोषणास्थळी जाऊन जरांगे याना उपोषण मागे घेण्याची मागणी केली. तसेच त्यांनी एक महिन्याचा वेळ मागितला. त्यानंतर मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला ४० दिवसांचा अल्टिमेट दिला. या अल्टिमेटला १४ ऑक्टोबरला ३० दिवस पूर्ण होणार आहेत. त्यानिमित्ताने १४ ऑक्टोबरला अंतरवाली गावात भव्य अशी सभा आयोजित करण्यात आली आहे.

हे ही वाचा: 

तेजस्वीनी पंडितने ट्विटवर शेअर करत देवेंद्र फडणवीस यांना केला सवाल

टोलनाक्यावर मनसैनिक हिरो, Raj Thackeray यांच्याकडून Shinde – Fadnavis टार्गेट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss