spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

लोकल सेवा विस्कळीत, हार्बर लाईनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला

मुंबई : सीएसएमटी रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर लोकल ट्रेनचा डबा घसरल्याची घटना घडली. ही लोकल सीएसएमटी रेल्वे स्थानकावरून पनवेलच्या दिशेने निघत असताना प्लॅटफॉर्म क्रमांक एक वरून लोकल ट्रेनचा एक डबा रेल्वे रुळावरून घसरला असल्याची प्राथमिक माहिती समोर येते. ही घटना प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर घटली असून प्लॅटफॉर्म क्रमांक दुसरा हा हरबर रेल्वे वाहतुकीसाठी उपलब्ध आहे. या अपघातात कोणतीही दुर्घटना झालेली नाही. परंतु नवी मुंबईच्या दिशेने जाणारी लोकल सेवा ही काही कालावधीसाठी विस्कळीत झाली आहे.

या घटनेनंतर रेल्वे प्रशासन तातडीने कामाला लागले असून दुरुस्तीचे काम त्वरित सुरू झालेले आहे. तर प्रवाशांमुळे झालेली गर्दी सांभाळायचे काम हे रेल्वे पोलीस कर्मचारी करत आहेत. रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी आपल्या ट्विटर हँडल वरून या घटनेची माहिती दिली. नवी मुंबईच्या दिशेने जाणारी एकच रेल्वे लाईन सुरू असल्यामुळे प्रवाशांना काही कालावधीसाठी त्रास सहन करावा लागेल.

हेही वाचा : 

दीपिकाचा पठाण सिनेमातील लूक, चाहत्यांची उत्सुकता वाढली

Latest Posts

Don't Miss