बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने उचलले मोठे पाऊल, स्वतःसह संपूर्ण कुटुंबाला मारून टाकले

बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने उचलले मोठे पाऊल, स्वतःसह संपूर्ण कुटुंबाला मारून टाकले

गडहिंग्लज येथील अर्जुन उद्योग समूहाचे प्रमुख, तरुण उद्योजक संतोष वसंत शिंदे (वय ४६, रा. गांधीनगर) यांनी पत्नी तेजस्विनी (३६) व गुलगा अर्जुन (१४) याला विष पाजले आणि स्वतः देखील विष पिऊन चाकूने त्यांचा व आपला गळा चिरून घेत बेडरूममध्ये आत्महत्या केली आहे . शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.

गडहिंग्लजमधील गांधीनगर येथे संतोष शिंदे यांचं घर आहे. शनिवारी सकाळी शिंदेंच्या आईने त्यांच्या बेडरुमचा दरवाजा ठोठावला असता त्यावेळी आतून कोणताही प्रतिसाद आला नाही. त्यामुळे त्यांनी आजूबाजूच्या लोकांना आवाज दिला.त्यांचा आवाज ऐकून शेजारी आले आणि त्यांनी त्यांच्या बेडरूमचा दरवाजा तोडला. दरवाजा उघडल्यावर त्यांना तिघांचाही मृतदेह जमिनीवर पडलेला दिसला.

गडहिंग्लजमधील (जि. कोल्हापूर) येथील माजी नगरसेविकेने संतोष शिंदे यांच्याविरुद्ध एप्रिलमध्ये बेळगाव पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा एप्रिल महिन्यात करण्यात आला होता.त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून घेतला होता. याप्रकरणी त्यांना त्यावेळी अटक करण्यात आली होती. याप्रकरणी ते एक महिना जेलमध्ये होते. त्यानंतर जामिनावर त्यांची सुटका झाली.यानंतर ते खूप मानसिक तणावात होते असे सामोरे आले आहे. त्यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडल्यामुळेच त्यांनी हे कृत्य केले अशीही चर्चा घटनास्थळी सुरु होती.प्रतिकूल परिस्थितीत शाखेची पदवी घेतलेल्या संतोष यांनी दहा वर्षांपूर्वी हसूरचंपू येथे अर्जुन रिफायनरी नावाने खाद्यतेल निर्मितीचा कारखाना सुरू केला होता. पुणे, मुंबईसह कोकणातही त्यांच्या खाद्यतेलाला खूप मागणी होती.

घटनास्थळी पोलिसांना एक डायरी सापडली आहे. त्यात लिहिलेल्या ‘सुसाइड नोटमध्ये ‘(sucide note)त्या’ माजी नगरसेविकेसह चौघांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे जमलेल्या लोकांनी ‘त्या’ चौघांच्या अटकेच्या मागणीसाठी सर्वत्र घोषणाबाजी केली. संतोष शिंदे हे विज्ञान शाखेतून पदवीधर (graduate)झाले असून त्यांनी विराज फूड्स (viraj foods) नावाने बेकरी उत्पादनांचा प्रकल्प आणि अर्जून फिटनेस (arjun fitness)नावाने जिम सुरू केल्या होत्या. या घटनेने संपूर्ण गडहिंग्लजसह कोल्हारपूरपर्यंत सर्वत्र खळबळ उडाली आहे.

 

 ही वाचा:

मानवाच्या ‘या’ चुकीमुळे जीवन धोक्यात! चक्क पृथ्वी झुकतेय एका बाजूला…

Mansoon Tips, पावसाळ्यात तुमच्या कपड्यांना देखील दुर्गंधी येतेय का? जाणून घ्या, सोपे उपाय!

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version