अमरावती प्रकरणात आला नवा ट्विस्ट

अमरावती प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला आहे. कुटुंबीयांच्या त्रासाला कंटाळूनच संबंधित मुलगी घर सोडून गेली होती अशी माहिती आता समोर आली आहे.

अमरावती प्रकरणात आला नवा ट्विस्ट

अमरावती प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला आहे. कुटुंबीयांच्या त्रासाला कंटाळूनच संबंधित मुलगी घर सोडून गेली होती अशी माहिती आता समोर आली आहे. बुधवारी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी हे प्रकरण लव्ह जिहादचं असल्याचा आरोप करत पोलिसांवरही आरोप केले होते. त्यावरुन काल मोठा वाद देखील झाला होता. आता या प्रकरणातील मुलीला पोलिसांनी शोधून काढलं असून ती मुलगी घरच्यांच्या त्रासाला कंटाळून पळून गेली होती असं स्पष्ट झालं आहे.

अमरावतीलमधून पळून गेलेल्या तरुणीने सातारा पोलिसांना तसा जबाब दिला असून ती तरुणी आज रात्रीपर्यंत अमरावतीमध्ये पोहोचणार असल्याची माहिती आहे. ती अमरावतीमध्ये आल्यानंतर तिचा सविस्तर जबाब घेण्यात येईल असं अमरावतीच्या पोलीस आयुक्तांनी सांगितलं आहे. घरच्यांकडून त्रास होत असल्याच्या रागातून ती मुलगी घरातून एकटीच पळून गेली होती अशी माहिती अमरावती पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी सांगितलं.

नवनीत राणा यांनी केलेला आरोप –

एका मुलीला पळून आंतरधर्मीय विवाह केल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर भाजप खासदार नवनीत राणा हिंदू संघटनाच्या कार्यकर्त्यांसह त्यांनी थेट राजापेठ पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर पीडित मुलीला समोर आणा अशी मागणी ही त्यांनी केली. लग्नानंतर मुलीला दाबून ठेवल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला. नवनीत राणा यांनी प्रचंड आरडाओरड केल्यामुळे या पोलीस ठाण्यातील अधिकारीही चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. पोलिसांनी पीडित मुलीला पोलीस स्टेशनमध्ये आणावे अशी मागणी करत पोलिसांनी या प्रकरणी तपासाला एवढा उशीर का लावला असा सवालही राणा यांनी उपस्थित केला. यावेळी नवनीत राणा यांनी पोलिसांनी आपला फोन रेकॉर्ड केल्याचाही आरोप केला. ‘मी याप्रकरणाचा तपास कुठपर्यंत आला, हे विचारण्यासाठी पोलिसांना फोन केला तेव्हा माझा फोन रेकॉर्ड करण्यात आला. राज्य सरकारने तुम्हाला माझा फोन रेकॉर्ड करण्याचे अधिकार दिलेत का, हे मला सांगा.’असे म्हणत नवनीत राणा यांनी प्रचंड आकांडतांडव केले.

खासदार नवनीत राणा यांनी ज्या मुलीला शोधण्यासंदर्भात काल पोलिसांना अल्टिमेटम दिलं होतं ती मुलगी अखेर सापडली आहे. कालच तिचा शोध लागला असून ती साताऱ्यात सापडली. त्यानंतर आज तिला अमरावती पोलिस घरी आणणार असल्याची माहित समोर येत आहे.

हे ही वाचा :- 

आंतरधर्मीय विवाह प्रकरणातील अमरावतीमधील पीडित युवती अखेर सापडली

देशद्रोही याकूब मेमनच्या वादग्रस्त कबरीवर कारवाई सुरु, सात वर्षांनी राजकारण तापलं

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version