परभणीत स्कूल बस व एसटी बसची समोरासमोर धडक, २० जण गंभीर जखमी

परभणीत स्कूल बस व एसटी बसची समोरासमोर धडक, २० जण गंभीर जखमी

परभणीतून मोठी बातमी समोर आहे. परभणीच्या (parbhani) गंगाखेड शहरातील (Gangakhed city) संत जनाबाई विद्यालयाच्या (Sant Janabai Vidyalaya) स्कूल बसचा (school bus) आणि एसटी बसची (ST Bus) समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये २० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर गंगाखेड (Gangakhed) उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चार जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी परभणी येथे नेण्यात आले आहे. हा अपघात गंगाखेड सावरगाव रोडवरील खंडाळी गावाजवळ झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पिंपळदरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

गंगाखेड शहरातील संत जनाबाई विद्यालयाची स्कूल बस विद्यार्थ्यांना घेऊन चाकूरकडे जात होती. गाडी गंगाखेड तालुक्यातील खंडाळी गावाजवळ आली असता अहमदपूर वरून बुलढाण्याला जाणाऱ्या एसटी बसचा आणि स्कूल बसचा समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये स्कूल बसमधील विद्यार्थी आणि एसटी बसमधील २० पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळतात पिंपळदरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये (Upazila Hospitals) नेण्यात आले आहे.

या ठिकाणी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर हेमंत मुंडे (Hemant Munde), वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्वाती मुंडे (Swati Munde), डॉक्टर केशव मुंडे (Keshav Munde), डॉक्टर योगेश मल्लुरवार (Yogesh Mallurwar) आणि रुग्णालयाच्या परिचारिकांनी अपघातामध्ये जखमी झालेल्या जखमींवर उपचार केला. अपघातात जखमी झालेल्या चार जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी परभणी येथे नेण्यात आले आहे. अशी माहिती गंगाखेड उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

हे ही वाचा : 

मुंबईत कारमधून १० महिन्याच्या चिमुकलीला बाहेर फेकून महिलेचा केला विनयभंग

Virat-Anushka Anniversary आधी भांडण मग प्रेम, अशी सुरू झाली अनुष्का-विराटची रंजक प्रेमकहाणी

नरेंद्र मोदींचा महारष्ट्रामधल्या विरोधकांना मारला टोला

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version