spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Gram Panchayat Election 2022 ग्रामपंचायत निवणुकांना लागले गालबोट, औरंगाबादमध्ये मतदान केंद्राबाहेर झाली हाणामारी

राज्यात सर्वत्र ग्रामपंचायत निवडणूक रणधुमाळी हि सुरु आहे. यातच आता औरंगाबादमध्ये मात्र या निवडणूकीला काहीश्या प्रमाणात गालबोट लागलं आहे.

Gram Panchayat Election 2022 : राज्यात सर्वत्र ग्रामपंचायत निवडणूक रणधुमाळी हि सुरु आहे. यातच आता औरंगाबादमध्ये मात्र या निवडणूकीला काहीश्या प्रमाणात गालबोट लागलं आहे. औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील सालवडगाव या ठिकाणी बोगस मतदानावरून झालेल्या वादातून मतदान केंद्राच्या परिसराच्या बाहेर हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. तर घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत परिस्थिती आटोक्यात आणली आहे. तर यात दोन जन जखमी झाले असून, त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रवींद्र पंढरीनाथ ठोंबरे आणि विनोद रघुनाथ ठोंबरे असे जखमींचे नावं आहे.

पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या मतदारसंघ असलेल्या पैठण तालुक्यात २२ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. विशेष म्हणजे या तालुक्यात एकही सरपंच बिनविरोध निवडून आला नाही. मात्र ९ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. नांदर, आडुळ, बिडकिन व मुधलवाडी या चार ग्रामपंचायतीची निवडणूक मंत्री भुमरे यांच्यासाठी प्रतिष्ठेची समजली जात आहे. तर सकाळपासून मतदानाला सुरवात झाली असून, तालुक्यात बहुतांश ठिकाणी शिंदे गट विरोधात ठाकरे गट असाच सामना पाहायला मिळणार आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात आज २१६ ग्रामपंचायतीसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य पद गावात प्रतिष्ठेचं पद समजले जाते, त्यामुळे गावागावात वेगवेगळे गट या निवडणुकीत आमने सामने पाहायला मिळत आहे. दरम्यान औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील सालवडगाव निवडणुकीवरून वाद झाल्याने मारहाणीचा प्रकार समोर आला आहे. ज्यात दोन जण जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. तर दोन्ही जखमींना पाचोड येथील शासकीय घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच पाचोड पोलिसांनी मतदान केंद्रावर तात्काळ धाव घेतली. तसेच दोन्ही गटाला पांगवले. तर जखमी झालेल्या दोघांना मेडकील मेमो देऊन शासकीय घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले. सद्या गावात शांतता असून, मतदान प्रकिया सुरळीत सुरु आहे. तर जखमी यांच्यावर रुग्णालयात उपचार सूर आहे. याप्रकरणी मारहाण झालेल्या गटाकडून दावा करण्यात आला आहे की, रवींद्र ठोंबरे हा मतदान करून निघाला होता. याचवेळी विरोधी गटातील दहा ते पंधरा जनांनी त्याला अडवून मारहाण केली. यावेळी एकाने हातात दगड उचलून याच्या छातीवर मारला. ज्यात तो जखमी झाला असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

जिल्ह्यात मुदत संपलेल्या २१६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोचली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत थेट सरपंचपदासाठी १०९२ ,तर सदस्यपदासाठी ५४८१ अशा ६५७४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यांपैकी ३७१ जणांचे अर्ज छाननीत बाद ठरले. तर १९०० जणांनी उमेदवारी मागे घेतल्याने सध्या सरपंचपदासाठी ६११ तर सदस्यासाठी ३६२६ असे ४२३७ उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लक आहेत. दरम्यान, यात थेट सरपंचपदी १४ तर सदस्यपदी ३०८ उमेदवारांच्या विरोधात एकही उमेदवार रिंगणात शिल्लक नसल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.

हे ही वाचा : 

Maharashtra Gram Panchayat Election 2022 निवडणुकांची रणधुमाळी, ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींसाठी मतदान

Nashik Gram Panchayat Election 2022 नाशिक जिल्ह्यात मतदान प्रक्रियेला सुरुवात, तर ७ ग्रामपंचायत बिनविरोध

Follow Us टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss