Wednesday, September 25, 2024

Latest Posts

रायगड किल्ल्यावर धक्कादायक प्रकार, चक्क पिंडदानाचा कार्यक्रम गडावर रायगडाची सुरक्षा धोक्यात?

किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधी स्थळाजवळ पिंडदान होत असल्याचा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओत पिंडदानाचे विधी सुरु असल्याचं दिसून येत आहे. हे सुरु असताना काही शिवप्रेमींनी याला विरोध केला, त्यानंतर व्हिडीओत दिसत असलेली लोक तिथून निघून गेल्याची माहिती समोर येत आहे.

यातच पिंडदानाच्या कार्यक्रमा संदर्भात मुख्यमंत्र्यांनी दखल घेण्याची मागणी संभाजी ब्रिगेडमार्फत करण्यात येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शनिवारी किल्ले रायगडावर (Raigad Fort) छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा द्वितीय शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला होता. याचदरम्यान, किल्ले रायगडावरील (Raigad Fort) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीजवळ असलेल्या जागेवर पिंडदान कार्यक्रम सुरू असल्याचे धक्कादायक चित्र दिसून आले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे (Sambhaji Brigade) कोकण प्रदेशाध्यक्ष आणि त्यांच्या सहकार्याने हा प्रकार थांबविण्याचा प्रयत्न केला. आता या संपूर्ण प्रकणाराचा व्हिडीओ व्हायरल झाला असून यासंदर्भात अद्यापी कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. या संदर्भात महाराजांचा अवमान होईल अशा प्रक्रिया राबविल्या जात असून हे वारंवार घडत असून शासनाने यावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. तर पुरातत्व विभागाने या समाजकंटकांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक असून स्थानिक शिवप्रेमींनी अशा समाजविघातक घटना थांबवण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.

या व्हिडीओवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले आहेत की, याची माहिती घेतली जाईल. तसेच जर कुठलंही चुकीचं काम होत असेल तर त्यावर कारवाई केली जाईल. आता उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर या घटनेवर पुढे कोणती कारवाई होणार का? हे पाहावं लागेल.

हे ही वाचा:

नवरात्रीनिमित्त मुंबईकरांसाठी बेस्टची भन्नाट ऑफर….

“पाकिस्तान जिंदाबाद” घोषणा दिलेल्या व्हिडिओचा फॉरेन्सिक तपास होणार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss