spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

उल्हासनगर मध्ये घडला धक्कादायक प्रकार, दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणावर जीवघेणा हल्ला

उल्हासनगर मध्ये घडला धक्कादायक प्रकार, दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणावर जीवघेणा हल्ला

दारू पिणं हे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे, दारूचे सेवन केल्याने मानसिक व शारीरिक परिणाम होतो, दारू ही आरोग्यासोबत एकंदर आयुष्यासाठी हानिकारक असते हे सर्वांना ज्ञात आहे, तरीही बरेच जण हे दारूचे सेवन करतात काहींना या दारूचं अत्यंत वाईट व्यसन असतं, त्यामुळे त्यांच्या शरीरावर आणि मानसिकतेवर परिणाम होते. मात्र या दारूच्या व्यसनामुळे त्यांच्यासोबत इतरांना ही याचा खूप त्रास होतो. दारूमुळे अनेकांचे संसार मोडले आहेत आणि आयुष्य उध्वस्थ झालेले आहेत. दारूचे व्यसन लागलेल्या व्यक्तींना दारू न पिल्याने किंवा दारू न मिळाल्याने अजून त्रास होतो आणि त्या त्रासामुळे ते काहीही करू शकतात.अशीच एक धक्कादायक घटना उल्हासनगरमध्ये घडलेली आहे, दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने एका व्यक्तीने एका तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार उल्हासनगरमधील कॅम्प १, बिर्ला गेट जवळ घडला आहे.

काय घडला नेमका प्रकार?

हा प्रकार १५ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी घडला. या दिवशी संध्याकाळी उल्हासनगर १ परिसरात राहणारा तरुण कुणाला सिंह चव्हाण हा उल्हासनगर कॅम्प १, बिर्ला गेट जवळ ताक पिण्यासाठी गेला होता त्याचवेळी आरोपी रमेश तलवार हा तिथे पोहचला आणि दारू पिण्यासाठी त्याने कुणाल चव्हाण याच्याकडे पैसे मागितल्यास कुणालने त्याला पैसे देण्यासाठी नकार दिला. याच मुद्यावरून आरोपी रमेश याने कुणालशी वाद घातला आणि त्या दोघांमधलं भांडण चांगलंच पेटलं.

कुणाल थोड्यावेळाने घरी जाण्यास निघाला तेव्हा आरोपी रमेश याने संतापाच्या भरात घरी निघालेल्या कुणाल वर जीवघेणा हल्ला करत त्याच्यावर धारधार शास्त्राने वार केले. यामुळे कुणाल गंभीर जखमी झाला आणि तेथील इतर नागरिक त्याच्या मदतीसाठी धावून गेले व त्याला उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले, हा झालेला संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. त्यानंतर उल्हासनगर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली त्यानंतर पोलिसांनी तातडीने आरोपी रमेश याला अटक करत न्यायालयात हजर केले असता, रमेशला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

हे ही वाचा : 

नाशिक ड्रग्ज प्रकरणी पालकमंत्री दादा भुसेंनी दिले कारवाईचे आदेश

दोन देशातील वादाचा परिणाम विदर्भातील संत्रा उत्पादक शेती, संतप्त शेतकऱ्यांचे आंदोलन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss