spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

ऑक्टोबर महिन्या अखेरीच सिनेप्रेमींसाठी बॉलीवूडची खास मेजवानी, पहा ‘ही’ चित्रपटांची यादी

तब्बल दोन वर्षांनी देशभरात दिवाळीचा (Diwali) उत्साह पहायला मिळतोय. नागरिक सुट्टीसाठी बाहेर फिरायला देखील जात आहे. त्याच सोबतच दिवाळीनिमित्त प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी विविध चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. दिवाळीच्या सणासोबतच हा आठवडा प्रेक्षकांसाठी खास असणार आहे. सिनेप्रेमींसाठी ओटीटी प्लॅटफॉर्मवरही काही चांगले चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. नवनवीन सीरिज आणि चित्रपटांची प्रेक्षक वाट पाहत असतात. येत्या काळात कोणते चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. जाणून घ्या चित्रपटांची यादी…

राम सेतू :

अक्षय कुमारचा राम सेतू हा चित्रपट येत्या २५ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. गेल्या काही काळापासून हा चित्रपट सोशल मीडियावर चर्चेत आहे. अभिषेक शर्मा दिग्दर्शित या चित्रपटात अक्षयसोबतच जॅकलिन फर्नांडिस आणि सत्य देव यांच्या भूमिका आहेत.

IND vs PAK: ऋषभ पंतला पाहून चाहत्यांनी ‘उर्वशी-उर्वशी’ ओरडत गोंधळ घातला, पाहा हा व्हिडिओ

थँक गॉड :

वादाच्या भोवऱ्यात अडकलेला अजय देवगणचा ‘थँक गॉड’ हा चित्रपट २५ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये अजयसोबत रकुल प्रीत सिंग आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या भूमिका आहेत.

गोविंदा नाम मेरा :

गोविंदा नाम मेरा हा चित्रपट येत्या ३० ऑक्टोबर रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. यामध्ये विकी कौशल, कियारा अडवाणी आणि भूमी पेडणेकर यांच्या भूमिका आहेत.

इंडियन प्रीडेटर ३ :

इंडियन प्रीडेटरचा तिसरा सिझन ‘मर्डर इन अ कोर्टरुम’ येत्या २८ ऑक्टोबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या सीरिजच्या पहिल्या दोन सिझनमध्ये भयानक हत्येची कहाणी दाखवण्यात आली होती.

‘राम सेतू’साठी लाइट मार्जिन

जिथे अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे, तिथे ‘राम सेतू’ला थोडा फायदा होताना दिसतोय, कारण मल्टिप्लेक्समध्ये प्रेक्षकांची संख्या जास्त असते. पण ही आघाडी फारशी नसेल, कारण जिथे अ‍ॅडव्हान्स बुकिंग होणार नाही, तिथे कॉमेडी जॉनरमुळे ‘थँक गॉड’ला चांगला प्रतिसाद मिळू शकतो.

आरे कॉलनीत बिबट्या चा हल्ला; दीड वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

दोन्ही चित्रपट दिवाळीला प्रदर्शित होत 

या दोन्ही चित्रपटांच्या निर्मात्यांनी दिवाळीच्या मुहूर्तावर आपला चित्रपट प्रदर्शित करण्याचा पर्याय ठेवला आहे, कारण दिवाळी हा वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो आणि याकाळात लोकांना सुटी देखील असते. या निमित्ताने प्रदर्शित होणारे चित्रपट सहसा चांगला व्यवसाय करतात. हे दोन्ही चित्रपट २५ ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहेत.

Latest Posts

Don't Miss